"पुरी (ओडिशा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो clean up using AWB
ओळ २६:
'''पुरी''' [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा]] राज्यातील एक शहर व [[पुरी जिल्हा|पुरी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
जगन्‍नाथपुरी शहरात [[जगन्नाथ मंदिर|जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर]] आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत.
 
जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात.
ओळ ३९:
 
==मूर्तीसाठी लाकडाचा शोध==
नव-कलेवराची तयारी चैत्र महिन्यापासून सुरू होते. चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका चांगल्या दिवशी शुभ मुहूर्त बघतात. त्या मुहूर्तावर धर्मशास्त्रानुसार सर्व विधी करून श्रीजगन्नाथाची आज्ञा घेऊन [[दैतापती]] छत्रचामरे घेऊन बडदांड (ज्या रस्त्यावरून जगन्नाथाचा रथ ओढला जातो तो रस्ता) वरून दारूयात्रेला (तिन्ही देव व सुदर्शनासाठी लागणार्‍या झाडाच्या ओंडक्याच्या शोधासाठी केलेले प्रस्थान) निघतात. यालाच ‘वनजाग विधी’ असेही म्हणतात. तेथून ते पुरी राजाच्या राजवाड्यावर जातात. राजा तिथे भिल्लांचा नायक-विश्वावसूवर कामाची सर्व जबाबदारी सोपवतो. मग त्याच्या देखरेखीखाली काकटपूर मंगळादेवीच्या दर्शनासाठी [[दैतापती]] निघतात. तिथे ते प्राची नदीच्या किनारी सिद्धमठात राहतात. देवीची पूजाअर्चा करून तिचा कौल मिळायची वाट बघतात. मुख्य [[दैतापती]]ला स्वप्नादेश मिळतो. ओंडके (दारू) कुठे कुठे मिळतील, हे मुख्य [[दैतापती]]ला स्वप्नात येते. त्यानुसार चार गटांत विभागणी होऊन [[दैतापतीं]]चे चार गट चार ओंडक्यांसाठी त्या-त्या ठिकाणी रवाना होतात. नव कलेवरासाठी जो ओंडका वापरला जातो त्याला ‘दारू’ म्हणतात. हा ओंडका कडुिलबाच्या झाडाचा असतो.
 
हे झाड कसे असावे याचे काही नियम ठरलेले आहेत. झाडाच्या आसपास एखादा आश्रम वा देऊळ असावे. जवळ स्मशान असावे. झाडाच्या आसपास नदी अथवा मोठा जलाशय असावा. झाडाच्या बुंध्याशी नागाचे वारूळ असावे. वारुळात नागाची वस्ती असावी. झाडाच्या फांद्या जमिनीपासून १२ फूट उंचीवर असाव्यात. म्हणजेच जमिनीपासून झाडाचा बुंधा १२ फूट एकसंध असावा. फांद्यांनी जवळच्या दुसर्‍या कोणत्याही झाडाला स्पर्श केलेला नसावा. झाडावर पक्ष्यांचे एकही घरटे नसावे. दुसर्‍याया कोणत्याही वेली झाडावर वाढत नसाव्यात. आणि नवल करण्यासारखी अट म्हणजे, झाडावर शंख, चक्र, गदा, पद्म यापकी एखादे चिन्ह असणे आवश्यक आहे.
 
अशा लक्षणांनी युक्त असे झाड सापडले, की झाड उतरवण्याअगोदर त्याच्या आसपासची जागा स्वच्छ करून तिथे होम करण्यासाठी जागा निवडतात. छोट्या छोट्या राहुट्या उभारून त्यात [[दैतापती]] राहतात. प्रथम पाच प्रकारची धान्ये पेरतात. मग मुख्य पुरोहित (विद्यापती) व विश्वकर्मा पाताळ नृसिंहाच्या मंत्राने नृसिंहाची उपासना करून होमात आहुती देतात. झाडावर असणार्‍या देवतांना झाड सोडून जाण्याची विनंती करतात. जगन्नाथाची आज्ञामाळ घेऊन [[दैतापती]] व ब्राह्मण वाद्यांच्या गजरात झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून ती माळ झाडाला बांधतात. एकदा झाडाला माळ बांधली, की झाड उतरवेपर्यंत सगळे उपवास करतात. सोन्याची व चांदीची अशा दोन छोटय़ा कुर्‍हाडी तयार करतात. त्या दोन व लोखंडाची एक अशा तीन कुर्‍हाडींची पूजा होते. होम झाला की विधिवत प्रथम विद्यापती सोन्याची, विश्वावसू चांदीची व विश्वकर्मा लोखंडाची कुर्‍हाड झाडाला लावतात. त्यानंतर झाड पाडणारे कामाला लागतात. मापाप्रमाणे बुंधा घेऊन झाडाचा उरलेला भाग तिथेच खड्डा खणून पुरून टाकतात. याला ‘पाताळी’ असे म्हणतात. हे सारे आटोपल्यावर सगळे उपास सोडतात.
ओळ ५२:
त्याच अमावास्येच्या रात्री पूर्ण अंधारात जुन्या मूर्तीच्या आत असलेला अलौकिक पदार्थ (यालाच ‘ब्रह्म’ म्हणतात.) पती महापात्र (मुख्य पुजारी) दारे बंद करून, डोळ्यांना पट्टी बांधून, हातालाही कापड गुंडाळून ‘ब्रह्म’ बाहेर काढतात व नव्या मूर्तीमध्ये त्याची स्थापना करतात. हे झाल्यावर जुन्या मूर्तीना २७ फूट मातीखाली समाधी देतात.
 
[[वर्ग:ओरिसामधीलओडिशामधील शहरे]]
[[वर्ग:पुरी जिल्हा]]