"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ८:
'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्‍हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात.
 
रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (अँटिजनअँटिजेन) रक्तगटाचा संबंध आहे. हे प्रतिजन आनुवंशिक असतात. ही प्रतिजने, प्रथिने, कर्बोदके, ग्लायकोप्रथिने, किंवा ग्लायकोलिपिड (मेदाम्ले) याने बनलेली असतात. रक्तगटाच्या पद्धतीप्रमाणे प्रतिजन कोणत्या रेणूनी बनलेले असतात हे ठरते. यामधील काहीं प्रतिजन इतर उतींच्या पेशी पृष्ठभागावर असतात. [[लाल रक्तपेशी|तांबड्या रक्त पेशीवरील]] पृष्ठभागावरील प्रतिजन युग्मविकल्पी (अलील) जनुकामुळे व्यक्त झालेले असतात. त्याना एकत्रपणे रक्तगट असे म्हणण्याची पद्धत आहे. रक्तगट आनुवंशिकता माता आणि पित्याच्या रक्तगटाच्या संक्रमणामुळे पुढील पिढीमध्ये येतात. एकूण तीसहून अधिक रक्तगट ज्ञात आहेत. आंतराष्ट्रीय रक्त संचरण समितीने याना मान्यता दिली आहे. ( इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन).
 
काहीं स्त्रियांमध्ये गर्भ मातेच्या रक्तगटाऐवजी वेगळ्या गटाचा असतो. अशा वेळी मातेच्या रक्तामध्ये गर्भाच्या रक्तपेशीविरुद्ध प्रतिजन तयार होतात. मातेच्या रक्तातील प्रतिजन (IgG) प्रकारचे असते .हे प्रतिजन अपरेमधून (प्लॅसेंटा) गर्भाच्या रक्तप्रवाहामध्ये जाते. अशा प्रतिजनामुळे नुकत्याच जन्मलेल्या बालकास रक्तपेशीविघटन आजार होतो. बालकामधील रक्तपेशींची संख्या या आजारामध्ये काळजी करण्याएवढी कमी होते.
ओळ १४:
== रक्तगट वेगवेगळे असण्याची कारणे ==
[[चित्र:ABO blood type.svg|lang=mr|300px|right|thumb|रक्तगट वेगवेगळे असण्याचे कारणे]]
रक्‍तात [[लाल रक्त पेशी]]वर एक प्रकारचे प्रोटीन (अ‍ॅन्टिजनअ‍ॅन्टिजेन) ही असतात. या अ‍ॅन्टिजनांच्याअ‍ॅन्टिजेनांच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट.
* रक्‍तातील आरएच (र्‍हिसस) हे सुद्धा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणार्‍याला आरएच निगेटिव्ह म्हणतात.
* रक्‍तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.
ओळ १४२:
''' रक्तगट प्रणाली '''
तांबड्या रक्तपेशींच्या पटलावर तीस प्रतिजन असतात. व्यक्तीचा रक्तगट तीस प्रतिजनापैकी एक संयोग असतो. तीस रक्तगटामध्ये सहाशेच्या वर विविध प्रतिजन संशोधकानी शोधलेले आहेत. यापैकी काहीं अगदीच दुर्मीळ आहेत. काहीं वंशामधील व्यक्तीमध्येच ते आढळतात.
बहुघा व्यक्तीचा रक्तगट जन्मत: प्रतिजन ठरविणाऱ्याठरविणार्‍या जनुकामुळे ठरतो. तो सहसा बदलत नाही. क्वचित संसर्ग, कर्करोग आणि स्वप्रतिकारयंत्रणेतील विकारामुळे (ऑटोइम्यून डिसीज) व्यक्तीचा रक्तगट बदलतो. अस्थिमज्जा रोपण हे रक्तगट बदलाचे एक कारण आहे. ल्यूकेमिया आणि लिंफोमा विकारात अस्थिमज्जा रोपण करावे लागते. व्यक्तीच्या एबीओ पैकी दुसऱ्या गटाच्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेचे रोपण झाल्यास रुग्णाचा रक्तगट अस्थिमज्जा दात्याच्या रक्तगटाप्रमाणे बदलतो. (उदा. ए गटाच्या व्यक्तीस ओ गटाच्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेचे रोपण केले).
रक्तगट आणि आजार यांचा संबंध आहे. उदाहरणार्थ ‘केल’ प्रतिजन मॅक्लॉड सिंड्रोमशी संबंधित आहे. रक्तगट आणि आजारामध्ये ‘डफी प्रतिजन’ (प्रथिन) रक्तपेशीवर असल्यास विशिष्ठ जातीच्या मलेरिया पासून संरक्षण मिळते. ज्या भागामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा भागामध्ये रक्तपेशीवर डफी प्रतिजने आढळली. डफी प्रतिजनाची निर्मिती निसर्ग निवडीमुळे मलेरियास प्रतिबंध करण्यासाठी झाली असावी .
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले