"वड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
No edit summary
ओळ १०:
 
==खोड, पाने,फुले,फळे==
वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात. हिरवट रंगाची, फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात. पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने लागलेली ही फळे बघून बहिणाबाईंना वडाच्या झाडाला पोपटाचे पीक आल्यासारखे वाटले होते. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो.<ref>http://www.loksatta.com/balmaifalya-news/novelty-of-nature-1069398/</ref>
 
==कृष्णवट==
ओळ २४:
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात.
 
चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आडळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणात याच्या उत्पत्तीची कथा आहे. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे ‘वड’ हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात.<ref>http://www.tarunbharat.net/Encyc/2016/6/18/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7.aspx</ref>
 
भगवान बुद्धाला वटवृक्षाखाली दिव्य ज्ञानाचा साक्षात्कार झाला व नंतर त्याने बौद्ध धर्माची स्थापना केली. त्यामुळे बौद्धधर्मीय वडास अतिशय पवित्र मानतात.
ओळ ३३:
{{कॉमन्स वर्ग|Ficus benghalensis|फायकस बेंगालेन्सिस}}
* {{संकेतस्थळ|http://www.hort.purdue.edu/newcrop/CropFactSheets/ficus.html|पर्ड्यू विद्यापीठाच्या शेतकी विभागाच्या संकेतस्थळावरील वडाची माहिती|इंग्लिश}}
 
 
{{भारतीय राष्ट्रचिन्हे}}
==संदर्भ==
 
 
 
[[वर्ग:वनस्पती]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वड" पासून हुडकले