"रासपुतीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Same image, but colored (GlobalReplace v0.6.0)
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = ग्रिगोरी रासपुतीन
| चित्र = Grigori Rasputin 1916.jpg
| चित्र_आकारमान =
ओळ ६३:
रासपुतीनने हळूहळू रशियाच्या शासन व्यवस्थेवरही आपली पकड घट्ट केली. रासपुतीनची मर्जी संपादन न करणार्‍यांची हकालपट्टी झाल्याने अनेक राजनिष्ठ व कर्तव्यदक्ष लोकांना शासनाबाहेर जावे लागले. त्यांच्याऐवजी स्वार्थी व तत्त्वशून्य व्यक्तींचा भरणा राज्ययंत्रणेत झाला. रशियाचे सरसेनापती '''निकोलाय निकोलाययेविच''' यांनाही झारने पदावरून काढून टाकले व ते पद स्वतः राखले. या घटनेमुळे अनेकांच्या मनात रासपुतीनबद्दल संताप उफाळून आला. ड्यूमा (रशियन संसद) मध्ये रासपुतीविरुद्ध एकमताने ठराव संमत झाला आणि ड्यूमाच्या शिफारशीवरून झार निकोलसने रासपुतीनला शिक्षा करण्याचे आदेश दिले. पण झारिना आलेक्सांद्राच्या दबावामुळे रासपुतीनची शिक्षा लगेच मागे घेण्यात आली.
 
रासपुतीनला ठार मारण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही असे अनेकांचे मत होते. दि. [[सप्टेंबर २९]] [[इ.स. १९१६|१९१६]] या दिवशी युसुपोव्ह नावाच्या एका उमरावाच्या घरी रासपुतीनला जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. त्या दिवशी रासपुतीनला मारण्याचा बेत आखला गेला. जेवणात विष कालवले होते. रासपुतीनने जेवणावर ताव मारला पण त्याच्यावर विषाचा परिणाम झाला नाही. मग युसुपोव्हने आपल्या पिस्तुलातून रासपुतीनवर गोळी झाडली, तरीही तो पळत ओरडत घराबाहेर अंगणात गेला. शेवटी पुरिश्केविचने आपल्या पिस्तुलातील सर्व गोळ्या रासपुतीनवर झाडल्या, रासपुतीन जागेवरच मारला गेला. रासपुतीन मारला गेल्याची बातमी कळताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. रासपुतीनच्या निधनानंतर अवघ्या काहीच महिन्यात मार्च १९१७ मध्ये रशियात राज्यक्रांती घडून आली आणि रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रासपुतीन" पासून हुडकले