"इंडिया गेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
new file
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|गेटवे ऑफ इंडिया}}
[[File:India Gate in New Delhi 03-2016.jpg|180px|thumb|right|इंडिया गेट]]
'''इंडिया गेट''' हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते [[दिल्ली]] येथे स्थित असून त्याची रचना [[एडविन लुटयेन्स|सर एडविन लुटयेन्स]] यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा [[पॅरीस]] येथील [[आर्क दे ट्रायम्फे]] ({{lang-fr|Arc de Triomphe}}) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील [[आर्क ऑफ टायटस]] ({{lang-en|Arch of Titus}}) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते '''ऑल इंडिया वॉर मेमोरिअल''' ({{lang-en|All India War Memorial}}) या नावाने ओळखले जात असे. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] व [[तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्ध|तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्धात]] मरण पावलेल्या ९०,००० [[ब्रिटिश इंडियन आर्मी|ब्रिटिश इंडियन आर्मीमधील]] सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे.
 
सुरुवातीला ब्रिटिश राजा [[पंचम जॉर्ज|पाचवा जॉर्ज]] याचा पुतळा इंडिया गेटसमोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालील पुतळे [[कोरोनेशन पार्क]] येथे हलविण्यात आले. सद्ध्या भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ ''अमर जवान ज्योती'' इंडिया गेट येथे आहे.