"अरुणा शानबाग प्रकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
अरुणा रामचंद्र शानबाग (१ जून १९४८ - १८ मे २०१५), एक भारतीय परिचारिका होत्या. त्यांच्यावर अमानुष पद्धतीने बलात्कार झाल्यामुळे त्या व्हेजिटेटिव्ह स्थितीमध्ये गेल्या. ह्या त्रासातून मुक्त करण्यासाठी त्यांना मरण (युथनेशिआ) देण्यात यावे ह्या मागणीसाठी कोर्टात प्रकरण देखील चालले.
 
परळ, [[मुंबई]] येथील किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल येथे कनिष्ठ परिचारिका म्हणून काम करत असताना अरुणा शानबाग यांच्यावर १९७३ साली सोहनलाल वाल्मिकी ह्या वॉर्ड बॉयने बलात्कार केला. ह्या घटनेनंतर त्या व्हेजिटेटिव्ह स्थितीमध्ये गेल्या. त्यांची मैत्रीण असलेल्या पत्रकार, पिंकी विरवाणी ह्यांनी अरुणा ह्यांना त्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी त्यांना मरण देण्यात यावे अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यांच्या स्थितीचे परीक्षण करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या एका समितीचे गठन करण्यात आले होते. ३७ वर्षे ह्या स्थितीत राहिल्यानंतर ७ मार्च २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. मात्र भारतात पॅसिव्ह युथनेशिआ देण्यास परवानगी देऊन सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक मत दिले.
 
जवळपास ४२ वर्षे व्हेजिटेटिव्ह स्थितीत राहिल्यानंतर १८ मे २०१५ रोजी अरुणा शानबाग ह्यांचा न्युमोनियाने मृत्यू झाला.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7623832.cms</ref>