"लक्ष्मीकांत-प्यारेलाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५७ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
प्यारेलाल यांच्या वडिलांना, म्हणजे पं. रामप्रसाद शर्माना (बाबाजी) सारे जण ट्रम्पेटवादक म्हणून ओळखत. गोरखपूर- बडोदा-्कलकत्ता-कराची-मुंबई-पुणे असा प्रवास करत ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांच्या काळात पाश्चात्त्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसे होती, त्यापैकी एक बाबाजी होते. त्यांनी त्यांच्याजवळची नोटेशनलेखनाची विद्या मुक्तहस्ताने सर्वाना दिली. प्यारेलाल यांना वयाच्या आठव्या वर्षी केव्हा तरी एके सकाळी आठ वाजता त्यांनी समोर बसवले आणि नोटेशन कसे करायचे ते अर्ध्या तासात शिकवले. त्यानंतर, पुढचे तीन दिवस बारा बारा तास प्यारेलाल यांनी नोटेशन लेखनाचा सराव केला, आणि ते तंत्र बर्‍यापैकी आत्मसात केले. त्यांनंतर वडिलांनी प्यारेलालच्या हातांत व्हायोलिन दिले.
 
व्हायोलिनवादकाला भारतीय किंवा पाश्चात्त्य संगीतात मरण नाही, असे वडील सांगत. त्यांनी प्यारेलालांच्या हाती व्हायोलिन दिले, पण वाजवायला शिकवले ते सहा महिन्यांनी. पाश्चात्त्य पद्धतीने व्हायोलिन वाजवण्यासाठी बसायची एक पद्धत आहे. व्हायोलिनवादक डावा खांदा व डावा पाय काहीसा पुढे काढून ताठ व डौलदार बसतो. व्हायोलिन खांद्यावर जिथे ठेवायचा तो भाग कसा धरायचा, व्हायोलिन कसे पकडायचे, त्याचा बो उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि तिसर्‍या चौथ्या बोटाने कसा धरायचा या सार्‍यांचे एक शास्त्र आहे. ते शास्त्र येईपर्यंत त्यांनी प्यारेलालना व्हायोलिन वाजवायला शिकवले नाही.<ref>http://www.loksatta.com/vruthanta-news/laxmikant-pyarelal-legends-of-hindi-music-creats-history-in-bollywood-songs-191999/</ref>
 
 
(अपूर्ण)
 
==संदर्भ==
 
{{फिल्मफेअरसंगीतपुरस्कार}}
 
५,७१७

संपादने