"लक्ष्मीकांत-प्यारेलाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''लक्ष्मीकांत-प्यारेलाल''' (ऊर्फ एल.पी. किवा लक्ष्मी-प्यारे) ही एक सुप्रसिद्ध बॉलीवुड संगीतकार जोडी होती. या जोडीत लक्ष्मीकांत शांताराम कुदळकर (इ.स. १९३७-१९९८) व प्यारेलाल रामप्रसाद शर्मा (जन्म : ३ सप्टेंबर, इ.स.१९४०) आहेत. त्यांनी इ.स. १९६३ ते १९९८ या काळात ५०० हून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले.
 
==प्यारेलाल शर्मा==
‘प्यारेलाल शर्मा आणि लक्ष्मीकांत कुदळकर हे दोघेही गाण्यांना चाली लावयचे आणि वाद्यसंगीताचे संयोजनही करायचे. प्यारेलालने चाल दिलेलं गाणं कोणते आणि लक्ष्मीकांतने चाल दिलेले गाणे कोणते, हे सांगता येणार नाही, इतके ते एकजीव व्हायचे त्या दोघांचे विचारच काय पण रक्तगटही एक (बी पॉझिटिव्ह) होते. एकदा आंघोळ करताना प्यारेलाल यांना एक चाल सुचली. लक्ष्मीकांतांनीही तीवर काम केलं होतं. दोघांची चाल एकसारखी निघाली.
 
==व्हायोलिनवादक==
प्यारेलाल शर्मा यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखं व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर यांनी त्यांना थांबवले आणि दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले, आणि हिंदी सिने-सृष्टीत सुप्रस्थापित झाले.
 
==शिक्षण==
प्यारेलाल यांच्या वडिलांना, म्हणजे पं. रामप्रसाद शर्माना (बाबाजी) सारे जण ट्रम्पेटवादक म्हणून ओळखत. गोरखपूर- बडोदा-्कलकत्ता-कराची-मुंबई-पुणे असा प्रवास करत ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांच्या काळात पाश्चात्त्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसे होती, त्यापैकी एक बाबाजी होते. त्यांनी त्यांच्याजवळची नोटेशनलेखनाची विद्या मुक्तहस्ताने सर्वाना दिली. प्यारेलाल यांना वयाच्या आठव्या वर्षी केव्हा तरी एके सकाळी आठ वाजता त्यांनी समोर बसवले आणि नोटेशन कसे करायचे ते अर्ध्या तासात शिकवले. त्यानंतर, पुढचे तीन दिवस बारा बारा तास प्यारेलाल यांनी नोटेशन लेखनाचा सराव केला, आणि ते तंत्र बर्‍यापैकी आत्मसात केले. त्यांनंतर वडिलांनी प्यारेलालच्या हातांत व्हायोलिन दिले.
 
व्हायोलिनवादकाला भारतीय किंवा पाश्चात्त्य संगीतात मरण नाही, असे वडील सांगत. त्यांनी प्यारेलालांच्या हाती व्हायोलिन दिले, पण वाजवायला शिकवले ते सहा महिन्यांनी. पाश्चात्त्य पद्धतीने व्हायोलिन वाजवण्यासाठी बसायची एक पद्धत आहे. व्हायोलिनवादक डावा खांदा व डावा पाय काहीसा पुढे काढून ताठ व डौलदार बसतो. व्हायोलिन खांद्यावर जिथे ठेवायचा तो भाग कसा धरायचा, व्हायोलिन कसे पकडायचे, त्याचा बो उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि तिसर्‍या चौथ्या बोटाने कसा धरायचा या सार्‍यांचे एक शास्त्र आहे. ते शास्त्र येईपर्यंत त्यांनी प्यारेलालना व्हायोलिन वाजवायला शिकवले नाही.
 
 
(अपूर्ण)
{{फिल्मफेअरसंगीतपुरस्कार}}