"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो →‎रक्त जुळवणी: शुद्धलेखन, replaced: आणी → आणि
ओळ १५७:
एबीओ नंतर आरएच हा रक्तसंचरणाच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा रक्तगट आहे. या रक्तगटामध्ये 50 प्रतिजन भाग घेतात. यामधील महत्त्वाचे प्रतिजन ‘डी’ मुळे पाच मुख्य प्रतिजनाशी संबंधित प्रतिपिंड निर्माण होतात . डी प्रतिजन रक्तामध्ये नसल्यास (डी निगेटिव्ह) IgG or IgM प्रतिपिंड नसतात. डी विरुद्ध प्रतिपिंड न तयार होण्याचे कारण म्हणजे पर्यावरणातील घटकामुळे हे प्रतिपिंड तयार होत नाही. डी विरुद्ध प्रतिपिंड तयार होण्याचे एकमेव कारण म्हणजे सेंन्सटायझेशन क्रिया. सूक्ष्म प्रमाणात डी प्रतिजन नसलेल्या रक्तामध्ये मिसळले म्ह्णजे डी प्रतिपिंडे तयार होतात. मातेचे रक्त आर एच निगेटिव्ह आणि गर्भाचे रक्त आर एच + असल्यास अपरेमधून डी प्रतिजनअसलेल्या पेशी मातेच्या रक्तप्रवाहात जातात. अशामुळे डी प्रतिपिंडे मातेच्या रक्तात मोठ्या प्रमाणात तयार होतात. क्वचित आरएच निगेटिव्ह रक्तामध्ये आर एच रक्त संचरणाचे वेळी आल्यास डी प्रतिपिंडे तयार होतात. आशियायी वंशाच्या व्यक्तीमध्ये आरएच निगेटिव्ह रक्ताचे प्रमाण अत्यल्प म्ह्णजे 0.3% एवढे आहे. या उलट युरोप आणि अमेरिकेत ते 15% आहे.
 
रक्तगटात वंशपरत्वे विविधता आहे. बी रक्तगट उत्तर भारत आणि मध्य आशियायी रक्तगट म्हणून ओळखला जातो.बी रक्तगटाचे प्रमाण पूर्व आणि पश्चिम दिशेच्या देशामध्ये कमी कमी होत जाते. स्पेनमध्ये बी रक्तगट अगदीच दुर्मीळ आहे. मूळ अमेरिकन आणि मूळ ऑस्ट्रेलियन वंशाच्या व्यक्तीमध्ये बी रक्तगट मुळीच नाही. युरोपमधून मानवी वसाहती अमेरिकेत आणीआणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरेपर्यंत हीच स्थिति होती.
 
युरोप, स्कँडेनेव्हिया, मध्य युरोप, आणि ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या मध्ये ए रक्तगट असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले