"कुष्ठरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎लक्षणे: वाक्याची अल्पपुर्नरचना
छो शुद्धलेखन, replaced: आणी → आणि (2)
ओळ २६:
 
==उपचार==
सर्वात प्रचलित कुष्ठरोगावरील उपचारामध्ये डॅप्सोन हे औषध दिले जाते. जेंव्हा हे औषध नव्याने वापरात आले त्या वेळी त्याची परिणामकता उत्तम होती. पण काहीं वर्षामध्ये डॅप्सोन प्रतिकार जिवाणू आढळल्यानंतर बहु उपचार पद्धती वापरण्यात येऊ लागली. या उपचार पद्धतीचे लघुरूप एमडीटी (मल्टि ड्र्ग थेरपी) असे आहे. एमडीटी मध्ये डॅप्सोन, रिफांपिन (रिफंमिसिन) आणि क्लोफॅझिमिन (लॅम्प्रीन) या तीन जिवाणूप्रतिबंधक औषधांचा उपयोग करण्यात येतो. एमबी कुष्ठरोगावर तीनही औषधे देण्यात येतात. पीबी कुष्ठरोगावर मात्र फक्त रिफांपिन आणीआणि डॅप्सोनचा वापर करण्यात येतो. तीन महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णाचा संसर्ग कमी व्हायला लागतो. उपचार चालू करण्याआधी बरेच रुग्ण संसर्गजन्य असत नाहीत. कुष्ठरोगाच्या प्रकारानुसार सहा महिने ते दोन वर्षे कुष्ठरोगावर उपचार घ्यावे लागतात.
कुष्ठरोगाच्या दोन्ही औषधांचा थोडा पार्श्व परिणाम होतो. डप्सोनमुळे मळमळ, गुंगी,हृदयगति वृद्धि, कावीळ आणि अंगावर पुरळ येऊ शकतात. पुरळ आल्यास त्वरिय वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॅप्सोनची रिफांपिन बरोबर आंतरक्रिया होते. रिफाम्पिन डॅपसोनच्या शरीरातील चयापचयाचा वेग वाढवते. त्यामुळे डॅपसोनचा डोस ॲयडजेस्ट करावा लागतो. रिफांपिन मुळे स्नायूदुखी आणि मळमळ सुरू होते. कावीळ किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तिसरे औषध क्लोफॅझिमिन मुळे पोटात तीव्र वेदना आणि अतिसार होतो. कधी कधी त्वचेचा रंग बदलतो. तांबडा ते काळसर बदललेला त्वचेचा रंग पूर्ववत होण्यास औषध बंदा केल्यानंतर बरीच वर्षेलागतात. थॅलिडोमाइड नावाचे जन्मजात दोष उत्पन्न होण्याबद्दलचे कुप्रसिद्ध औषध सध्या कुष्ठरोगाची गुंतागुंत कमी करते. थॅलिडोमाइड शरीरातील ट्यूमर विघटन यंत्रणा नियंत्रित करते.
कुष्ठरोगाच्या रुग्णाना उपचार चालू असता गंभीर प्रतिकार यंत्रणा होण्यास तोंड ध्यावे लागते. याला लेप्रि रिॲ.क्शन असे म्हणतात. प्रतिजैविकामुळे एम लेप्रि जिवाणूच्या पेशीपटलावरील प्रथिनामुळे शरीराची प्रतिकार यंत्रणा कार्यांवित होते. काहीं व्यक्तीमध्ये प्रतिपिंड आणि एम लेप्रि च्या प्रतिजनाबरोबर एकत्र येतात त्यामुळे त्वचेवर नव्याने चट्टे येणे आणि चेता तंतूंची टोके नष्ट होणे असे होऊ शकते. या प्रकारास इरिथेमा नोडोसम लेप्रोसम म्हणतात. कॉर्टिसोन औषधांचा वापरआणि थॅलिडोमाइड चा वापर केल्यास लेप्रा रिॲेक्शन आटोक्यात येते. काहीं रुग्णामध्ये उअपचारादरम्यान झालेले तीव्र आंत्र व्रण त्वचा रोपणाने बरे होतात.
ओळ ३२:
==पूर्वानुमान==
कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. चेतामध्ये आणि अवयवामध्ये झालेले बदल दुरुस्त करता येत नाहीत. कुष्ठरोग्याचे पुनर्वसन हा कुष्टरोगाच्या उपचारचा अविभाज्य भाग आहे. पुनरर्चना शस्त्रक्रिया , बिघडलेले अवयव दुरुस्त करणे हे अवघड कार्य शल्यतज्ञाना करावे लागते. कधी कधी अवयव पुन्हा कार्य करण्यापलिकडे गेलेले असल्याने शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही.
सर्वकष उपचारामध्ये रुग्णास स्वावलंबी बनविण्यावर भर दिलेला असतो. चेता मध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला असल्यास अवयवामध्ये विकृती येण्याची शक्यता असते. संवेदना रहित अवयवाची काळजी घेणे याचे प्रशिक्षण रुग्णाना द्यावे लागते.( मधुमेही रुग्णामध्ये पायाची काळजी घेण्यास शिकवले जाते ) हातापायांच्या जखमा असल्यास त्यावर त्वरित उपाययोजना करावी लागते. पायाच्या जखमेकडे दुर्लक्ष केल्यास जखमा जिवाणुसंसर्गाने चिघळतात. भौतिक चिकित्सा उपायाने हाता पायाची बोटे कार्यक्षम ठेवण्यास मदत होते. भारतात अशा रुग्णाना हातमागाचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे हात आणीआणि पाय कार्यक्षम राहण्यास मदत होते. हात आणि पायाना आधार देण्यासाठी पूर्वरचित भाग बांधल्याने अवयवामधील सामान्य बिघाड आटोक्यात येतात. कुष्ठरोग्यासाठी खास पद्धतीची पादत्राणे बनवली आहेत. त्यामुळे पायास व्रण होणे टळते.
प्रतिबंध: त्वरित निदान आणि उपचार केल्याने इतिहास काळातील या रोगावर मात केली आहे. कुष्ठरोग्याशी संपर्क आलेल्या व्यक्तीची तपासणी हा नवे रुग्ण होण्याचे थांबवण्याचा उत्तम मार्ग आहे. अशा व्यक्तींची सतत पाच वर्षे तपासणी करणे गरजेचे आहे. काहीं ठिकाणी रुग्णाच्या सहवासातील व्यक्तीना प्रतिबंधक उपाय म्हणून डॅपसोन उपचार दिले जातात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कुष्ठरोग" पासून हुडकले