"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
==परिचय==
१९७८ मध्ये दिलीप कुलकर्णी यांना मेकॅनिकल [[अभियांत्रिकी|अभियांत्रिकीची]] पदविका मिळाली. १९७८ ते १९८४ सालांपर्यंत ते [[पुणे|पुण्याला]] [[टेल्को]] कंपनीमध्ये काम करीत होते. त्यानंतर १९८४ ते १९९३ दरम्यान, [[विवेकानंद|विवेकानंद केंद्र]] ( [[कन्याकुमारी]]) येथे पूर्ण वेळेचे काम. त्या काळात त्यांनी ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सान्निध्यातली जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे ([[दापोली|दापोली तालुका]], रत्‍नागिरी जिल्हा) या खेडयात सहकुटुंब स्थायिक झाले आहेत. {{संदर्भ हवा}}
 
रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्‍न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. [[रेडिओ|रेडिओचा]] अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही.
 
इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णींचे [[नांदेड|नांदेडच्या]] ’नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले. त्यांचे विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे आणि मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन करणे चालूच असते. पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक ते चालवतात. '[[निसर्गायण]]', 'ग्रीन मेसेजेस' आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळांमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात. कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्‍न {{संदर्भ हवा}} आहे.
 
==पुरस्कार, सन्मान==