"रेल्वे इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
छो →‎इंजिनांचे प्रकार: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2)
ओळ ६:
 
==इंजिनांचे प्रकार==
*[[वाफेचे इंजिन]]: कोळसा जाळून एका मोठ्या बंबात [[पाणी|पाण्याची]] [[वाफ]] निर्माण केली जाते व ह्या वाफेच्या उर्जेवर इंजिन चालते. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जवळजवळ सर्व रेल्वेगाड्या वाफेच्या इंजिनांवर चालत असत. वाफेची इंजिने तांत्रिक दृष्ट्या अक्षम असतात व ती चालवायला व कार्यरत ठेवायला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. ह्या कारणांस्तव आधुनिक डिझेल व विद्युत इंजिनांच्या आगमनानंतर वाफेची इंजिने मागे पडली व हळूहळू सेवेतून काढली गेली. [[भारतीय रेल्वे]]ने १९९७ साली वाफेच्या इंजिनांचा वापर पूर्णपणे बंद केला. आजच्या घडीलासध्या वापरात असणारे सर्वात जुने वाफेचे इंजिन हे १८५५ साली तयार केले गेलेले ''फेरी क्वीन'' हे असून ते आजही भारतातील [[दिल्ली]] ते [[अलवर]] ह्या स्थानकांदरम्यान धावते.
 
*[[डिझेल इंजिन]]: १९४०च्या दशकात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेमध्ये]] डिझेल इंजिनांचा वापर सुरू झाला व [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] जगभर डिझेल इंजिने वापरात आली. [[मोटारवाहन]]ांप्रमाणे डिझेल इंजिनामध्ये [[अंतर्गत ज्वलन इंजिन]] हे तंत्रज्ञान वापरून यांत्रिक उर्जा तयार केली जाते. वाफेच्या इंजिनांच्या तुलनेत डिझेल इंजिने अधिक कार्यक्षम असतात व त्यांची देखभाल कमी करावी लागते तसेच त्यांच्यामुळे कमी वायू[[प्रदूषण|प्रदुषण]] होते.
 
*[[विद्युत इंजिन]]: ह्या प्रकारचे इंजिन [[विद्युत]]शक्तीवर चालते. [[लोहमार्ग]]ांच्या वर विद्युतभाराचा पुरवठा करणाऱ्या तारा उभारल्या जातात व ह्या तारांद्वारे इंजिनाला विद्युतपुरवठा होतो. लोहमार्गांचे विद्युतीकरण करण्यासाठी बराच खर्च येतो परंतु विद्युत इंजिने चालवण्यासाठी कमी खर्च येतो व विद्युत इंजिनांचे आयुर्मान बरेच जास्त असते. जगातील बहुसंख्य देशांमधील रेल्वेगाड्या आजच्या घडीलासध्या विद्युत इंजिनांवर चालतात. भारतातील ८५ टक्के प्रवासी रेल्वे वाहतूकीसाठी विद्युत इंजिने वापरली जात आहेत.
 
==गॅलरी==