"लखनौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २४:
|longd = 80 |longm = 54 |longs = |longEW = E
}}
'''लखनौ''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: लखनऊ) ही [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्याची राजधानी व [[उत्तर भारत]]ामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ साली ४८ लाख लोकसंख्या असणारे लखनौ भारतामधील दहाव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. ''[[नवाब]]ांचे शहर'' ह्या टोपणनावाने ओळखले जात असलेले लखनौ उत्तर प्रदेशच्या मध्य भागात [[गोमती नदी]]च्या काठावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून [[अवध]] भूभागाची राजधानी असलेले लखनौ [[मुघल साम्राज्य]]ाच्या [[दिल्ली सल्तनत]]ीचा भाग होते. आजच्या घडीलासध्या लखनौ उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र असून येथील शिवणकाम, पाककला भारतभर प्रसिद्ध आहेत. हिंदीसोबत [[अवधी भाषा|अवधी]] व [[उर्दू भाषा|उर्दू]] ह्या भाषादेखील लखनौमध्ये वापरात आहेत.
 
उत्तर प्रदेश व भारताच्या राजकीय पटलावर लखनौला अनन्यसाधारण महत्त्व आहे. [[भारताचे पंतप्रधान|भारताचे माजी पंतप्रधान]] [[अटलबिहारी वाजपेयी]] येथील [[लखनौ (लोकसभा मतदारसंघ)|लखनौ]] लोकसभा मतदारसंघामधून सलग ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवून लोकसभेवर गेले होते. भारताचे विद्यमान [[भारताचे गृहमंत्री|गृहमंत्री]] [[राजनाथ सिंह]] २०१४ सालच्या निवडणुकीत येथूनच निवडून आले.
"https://mr.wikipedia.org/wiki/लखनौ" पासून हुडकले