"सोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २६:
'''सोल''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 서울) ही [[पूर्व आशिया]]मधील [[दक्षिण कोरिया]] देशाची [[राजधानी]] व सगळ्यात मोठे [[शहर]] आहे. १ कोटीहून अधिक शहरी व सुमारे २.५ कोटी महानगरी लोकसंख्या असलेले सोल हे [[आर्थिक सहयोग व विकास संघटना|ओईसीडी]] सदस्य देशांमधील सर्वाधिक तर जगातील १२व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. तसेच सोल महानगर [[तोक्यो]]खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे [[महानगर]] आहे.
 
[[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या मध्य-पश्चिम भागात [[हान नदी]]काठी वसलेल्या सोलला २००० पेक्षा अधिक वर्षांचा [[इतिहास]] आहे. [[चोसून]] तसेच [[कोरियन साम्राज्य]]ाच्या काळात सोल हे [[कोरिया]]चे राजधानीचे शहर होते. [[कोरियन युद्ध]]ामध्ये बेचिराख झालेल्या सोलने १९६० ते [[२०००]] ह्या ४० वर्षांच्या काळात लक्षणीय प्रगती केली. आजच्या घडीलासध्या ७७३.९ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] इतकी उलाढाल असलेले सोल हे [[तोक्यो]], [[न्यू यॉर्क शहर]] व [[लॉस एंजेल्स]]खालोखाल जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे शहर आहे. तंत्रज्ञानामध्ये जगात आघाडीवर असणाऱ्या सोलमध्ये [[सॅमसंग]], [[एलजी]], [[ह्युंडाई]] इत्यादी महा-कंपन्यांची मुख्यालये आहेत.
 
सोलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट पायाभुत सुविधा असून येथील वाहतूक व्यवस्था अव्वल दर्जाची आहे. [[सोल महानगरी सबवे]] ही जगातील सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी [[रेल्वे]] आहे व येथील [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] जगात सर्वोत्तम मानला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/सोल" पासून हुडकले