"केप व्हर्दे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३८:
|माविनि_वर्ग =<span style="color:orange;">मध्यम</span>
}}
'''काबो व्हर्देचे प्रजासत्ताक''' ({{lang-pt|República de Cabo Verde}}; लोकप्रिय नाव: केप व्हर्दे) हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेच्या]] किनाऱ्याजवळ १० बेटांच्या [[द्वीपसमूह]]ावर वसलेला एक [[देश]] आहे. हा द्वीपसमूह [[अटलांटिक महासागर]]ामध्ये [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेच्या]] ५७० किमी पश्चिमेस स्थित आहे. १५व्या शतकापर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य असलेला हा द्वीपसमूह १४६० साली [[पोर्तुगाल|पोर्तुगीजांनी]] शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] गुलामांना युरोपामध्ये नेणारी जहाजे येथे थांबा घेत असत. ह्यामुळे १७व्या व १८व्या शतकात केप व्हर्देची भरभराट झाली. १९व्या शतकात गुलागिरीवर बंदी घालण्यात आल्यानंतर केप व्हर्देची अर्थव्यवस्था खालावत गेली. १९७५ मध्ये पोर्तुगालने केप व्हर्देला स्वातंत्र्य मंजूर केले. आजच्या घडीलासध्या केप व्हर्दे [[संयुक्त राष्ट्रे]], [[आफ्रिकन संघ]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २०१५ साली ५.२५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्देचे बहुसंख्य रहिवासी मिश्र युरोपीय व आफ्रिकन वंशाचे आहे.
 
केप व्हर्दे आफ्रिकेमधील प्रगत व संपूर्ण लोकशाही असलेल्या देशांपैकी एक आहे. येथे फारशी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध नसल्यामुळे केप व्हर्देची अर्थव्यवस्था पर्यटन व परकीय गुंतवणुकीवर अवलंबून आहे. २००७ साली केप व्हर्देला अविकसित देशांच्या गटातून विकसनशिल देशांच्या गटात बढती देण्यात आली. आफ्रिकेत हुकुमशाही व अराजकता वाढीस लागली असताना केप व्हर्देला येथील राजकीय व सामाजिक स्थैर्य व आर्थिक प्रगतीसाठी कौतुकाचे प्रमाणपत्र दिले जाते. २०१४ सालच्या [[लोकशाही निर्देशांक]]ानुसार येथील लोकशाही जगात ३१व्या क्रमांकाची बळकट मानली जाते.