"टेक्सास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ६०:
टेक्सासच्या पूर्वेला [[लुईझियाना]], ईशान्येला [[आर्कान्सा]], उत्तरेला [[ओक्लाहोमा]] व पश्चिमेला [[न्यू मेक्सिको]] ही राज्ये, दक्षिणेला [[मेक्सिको]]ची [[कोआविला]], [[नुएव्हो लिओन]] व [[तामौलिपास]] ही राज्ये तर आग्नेयेस [[मेक्सिकोचे आखात]] आहे. [[ऑस्टिन|ऑस्टिन]] ही टेक्सासची राजधानी आहे तर [[ह्युस्टन]], [[डॅलस]] व [[सॅन अँटोनियो]] ही प्रमुख शहरे आहेत.
 
आजच्या घडीलासध्या टेक्सास हे अमेरिकेतील आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचे राज्य आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या टेक्सासचा $१.२२८ सहस्त्रअब्ज इतका जीडीपी [[भारत]] देशाच्या जीडीपीसोबत तुलनात्मक आहे. कृषी, खनिज तेलविहीरी, संरक्षण, उर्जा हे टेक्सासमधील काही प्रमुख उद्योग आहेत. टेक्सासमधील व्यापार व उद्योगांसाठी पोषक वातावरण, कमी कर, स्वस्त व मोठ्या संख्येने उपलब्ध असणारा मजूरवर्ग इत्यादी कारणांमुळे अमेरिकेमधील इतर राज्यांमधून (विशेषतः उत्तर व ईशान्येकडील) अनेक उद्योग टेक्सासमध्ये स्थानांतरित झाले आहेत व होत आहेत. ह्यामुळे टेक्सासमधील लोकसंख्यावाढीचा दर अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. २००० ते २०१० ह्या दहा वर्षांदरम्यान टेक्सासाची लोकसंख्या २० टक्क्यांनी वाढली.
 
भौगोलिक दृष्ट्या मेक्सिकोला लागून असल्यामुळे मेक्सिकन व स्पॅनिश संस्कृतीचा टेक्सासवर पगडा आहे. येथील २७ टक्के रहिवासी [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]] भाषिक आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/टेक्सास" पासून हुडकले