"भुवनेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३६:
|longd = 85 |longm = 50 |longs = 24 |longEW = E
}}
'''भुवनेश्वर''' ही [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा]] राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर शहर ओडिशाच्या पूर्व भागात वसले आहे. [[महानदी]] भुवनेश्वरच्या ईशान्येकडून वाहते. १९४६ साली वसवले गेलेले भुवनेश्वर [[जमशेदपूर]] व [[चंदिगढ]]सोबत भारतामधील सर्वात पहिले रेखीव (Planned) शहर होते. १९४८ साली ओरिसाची राजधानी [[कटक]]हून भुवनेश्वरला हलवण्यात आली. आजच्या घडीलासध्या भुवनेश्वर ओडिशाचे आर्थिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र आहे. केवळ २५ किमी अंतरावर असलेली कटक व भुवनेश्वर ही भारतामधील प्रमुख [[जोडशहरे]] आहेत. [[हिंदू धर्म]]ामधील [[चार धाम]] ह्या सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले [[पुरी, ओडिशा|जगन्नाथपुरी]] हे स्थान भुवनेश्वरच्या ६० किमी दक्षिणेस तर [[कोणार्क सूर्य मंदिर]] ६५ किमी दक्षिणेस स्थित आहेत.
 
अनेक सहस्त्रकांचा इतिहास असलेल्या भुवनेश्वरचा उल्लेख सर्वप्रथम [[कलिंगचे युद्ध|कलिंगच्या युद्धामध्ये]] आढळतो. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खारवेलने शिशुपालगड येथे आपली राजधानी वसवली. सातव्या शतकात कलिंग साम्राज्याची राजधानी भुवनेश्वर येथेच होती. २०११ साली भुवनेश्वरची लोकसंख्या ८.४३ लाख इतकी होती. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे व शैक्षणिक संस्थांचे नवे केंद्र बनलेले भुवनेश्वर भारतामधील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक आहे.