"काँगोचे प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो (Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q971)
छो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)
'''काँगोचे प्रजासत्ताक''' (''काँगो'') हा [[मध्य आफ्रिका|मध्य आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. काँगोच्या शेजारी [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]], [[गॅबन]], [[मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक]], [[कामेरून]] व [[अँगोला]] देशाचा [[कबिंडा]] हा प्रांत आहे. पश्चिमेकडे काँगोला [[अटलांटिक महासागर]]ाचा अत्यंत लहान समुद्रकिनारा लाभला आहे. [[काँगो नदी]]काठावर वसलेले [[ब्राझाव्हिल]] ही काँगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. शेजारील [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]] ह्या देशापासून वेगळा ओळखला जाण्यासाठी काँगोला अनेकदा काँगो-ब्राझाव्हिल असे संबोधले जाते.
 
इ.स. १९६० सालापर्यंत काँगो ही [[फ्रान्स]]ची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. आजच्या घडीलासध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून [[डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो]] हा काँगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.
 
येथील अर्थव्यवस्था शेती व [[खनिज तेल]]ावर अवलंबून असून खाणकाम हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.
३२,६४४

संपादने