"तालिबान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ २:
 
==पाकिस्तान==
[[तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान]] या दहशतवादी संघटनेची स्थापना [[बैतुल्ला मसूद]] या कडव्या दहशतवाद्याने २००७ साली [[पाकिस्तान]]मध्ये केली. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील 'फेडरली अॅडमिनिस्टर्डॲडमिनिस्टर्ड ट्राइबल एरिया' अर्थात फटा क्षेत्रात १९८०च्या दशकापासून फोफावलेल्या अनेक इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटना एकत्र करून त्याने या संघटनेची स्थापना केली. या संघटनेची तीन मुख्य उद्दिष्टे होती. एक म्हणजे अमेरिकेचा कट्टर विरोध करणे. दोन, पाकिस्तानमध्ये शरियतवर आधारित असेलेले कट्टर इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तीन, अफगाणिस्तान, चीन व भारतातील जिहादी संघर्षाला समर्थन, सहकार्य करणे.
 
विशेष म्हणजे ही संघटना पाकिस्तानी लष्कराला पहिल्यापासूनच [[इस्लाम]]चा शत्रू मानत आली आहे. पाकिस्तान जरी इस्लामिक राष्ट्र असले, तरी कट्टर इस्लामी राज्याची फार कमी वैशिष्ट्ये पाकिस्तानात आहेत. असे कडवे इस्लामिक राज्य पाकिस्तानात आणण्यात सर्वात मोठा अडथळा पाकिस्तानचे लष्कर असल्याचे या संघटनेचे मत आहे. पाकिस्तानमधील राजकीय नेतृत्व लष्कराच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे या संघटनेने आपल्या स्थापनेनंतर लगेचच पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व आणि लष्कराला लक्ष्य करायला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने या संघटनेविरुद्ध लष्करी कारवाई केली व त्यासाठी अमेरिकेची मदत घेतली.
"https://mr.wikipedia.org/wiki/तालिबान" पासून हुडकले