"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
→‎top: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
छो (→‎top: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा)
मादीने पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणा-या दुधास कोलोस्ट्रम म्ह्णतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात. पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधाचा अन्नात समावेश केला आहे. गाय,बकरी,उंट,म्हैस, याक, गाढवीण यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते. अधिक उपलब्ध झालेले दूध टिकवून ठेवण्यासाठी दूध विरजून त्याचे दही आणि चीझ बनवण्याची पद्धत सु. दोन हजार वर्षापूर्वीची आहे.
स्तनामध्ये तयार झालेले दूध स्तनपान केल्याशिवाय पिलाना मिळत नाही. त्यासाठी स्तनाग्रे चोखण्याची क्रिया करावी लागते. पिलानी स्तनाग्रे चोखण्यास प्रारंभ केल्यास पश्च पोषग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्त्रवते. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाने स्तनामध्ये साठलेले दूध आचळातून बाहेर वाहते. (पहा दुग्धस्रवण). आता दुग्धव्यवसाय पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केला जातो. भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते. यास धवल क्रांती या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते.
दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचेसुद्धा शोषण होते. त्यामुळे सस्तन प्राण्यांची हाडे अधिक बळकट बनतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारातील महत्वाचा कॅल्शियमचा स्त्रोत बनला आहे. याबरोबर दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे हीसुद्धा समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. {{संदर्भ हवा}}
 
== माणसांच्या आहारातील दूधाचे स्थान ==
३२,१२०

संपादने