"इंडिया गेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
new file
छो (Bot: Migrating 30 langlinks, now provided by Wikidata on d:Q245347)
(new file)
{{गल्लत|गेटवे ऑफ इंडिया}}
[[File:India Gate cleanin New Delhi 03-2016.jpg|180px|thumb|right|इंडिया गेट]]
'''इंडिया गेट''' हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते [[दिल्ली]] येथे स्थित असून त्याची रचना [[एडविन लुटयेन्स|सर एडविन लुटयेन्स]] यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा [[पॅरीस]] येथील [[आर्क दे ट्रायम्फे]] ({{lang-fr|Arc de Triomphe}}) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील [[आर्क ऑफ टायटस]] ({{lang-en|Arch of Titus}}) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते '''ऑल इंडिया वॉर मेमोरिअल''' ({{lang-en|All India War Memorial}}) या नावाने ओळखले जात असे. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] व [[तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्ध|तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्धात]] मरण पावलेल्या ९०,००० [[ब्रिटिश इंडियन आर्मी|ब्रिटिश इंडियन आर्मीमधील]] सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे.
 
४१

संपादने