"वसंतसंपात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[सूर्य]] [[क्रांतिवृत्त|क्रांतिवृत्तावर]] दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धामध्ये जाताना [[विषुववृत्त|विषुववृत्ताला]] [[संपात बिंदू]]मध्ये जेव्हा छेदतो, त्या घटनेला '''वसंतसंपात''' म्हणतात आणि त्या संपात बिंदूला '''वसंतसंपात बिंदू''' म्हणतात. पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही. तो दर २६ हजार वर्षांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे जसा जसा पृथ्वीचा अक्ष फिरतो, तसा तसा वसंतसंपात बिंदू पश्चिमेकडे सरकत जातो. प्रत्येक वर्षी तो ०.०१४ अंशांनी (५०.४ [[विकला]]) सरकतो.<ref>{{ज्ञानकोश स्रोत | शीर्षक = सायन व निरयन पंचांगे | दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand9/index.php/9-2014-11-07-10-37-34/9170-2012-02-15-05-42-19?showall=&start=4 | encyclopedia = मराठी विश्वकोश | publisher = मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ| volume = खंड ९ | लेखक = ठाकूर, अ. ना.}}</ref> [[ग्रेगरियन दिनदर्शिका|ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार]] वसंतसंपात दर वर्षी १९ ते २१ मार्च यापैकी एका दिवशी येतो. भारत शासनाची कालगणना ज्या घटनांवर आधारित आहे (वसंतसंपात, दक्षिणायन, शरदसंपात व उत्तरायण) यापैकी वसंतसंपात हा एक महत्त्वाचा घटक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.loksatta.com/daily/20090402/muvr09.htm | शीर्षक = राष्ट्रीय वर्षगणना | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | पहिलेनाव = रवींद्र द. | आडनाव = खडपेकर | दिनांक = २ एप्रिल २००९ }}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.lokprabha.com/20110114/kalganana.htm | शीर्षक = कालगणना | प्रकाशक = [[लोकप्रभा]] | पहिलेनाव = रवींद्र द. | आडनाव = खडपेकर | दिनांक = १४ जानेवारी २०११ }}</ref>
 
* [[तारकासमूह|आधुनिक तारकासमूहांनुसार]] वसंतसंपात बिंदूने इ.स.पू. १८६६ साली [[वृषभ (तारकासमूह)|वृषभ]] तारकासमूहातून [[मेष (तारकासमूह)|मेष]] तारकासमूहामध्ये प्रवेश केला, इ.स.पू. ६८ साली [[मीन (तारकासमूह)|मीन]] मध्ये प्रवेश केला,. इ.स. २५९७ मध्ये हा बिंदू [[कुंभ (तारकासमूह)|कुंभ]] मध्ये प्रवेश करेल आणि इ.स. ४३१२ साली [[मकर (तारकासमूह)|मकर]] तारकासमूहामध्ये प्रवेश करेलतारकासमूहात.
 
वसंतसंपाताला इंग्रजीमध्ये मार्च इक्विनॉक्स (March equinox), नॉर्थवर्ड इक्विनॉक्स (Northward equinox) किंवा उत्तर गोलार्धामध्ये व्हर्नल इक्विनॉक्स (vernal equinox) म्हणून संबोधले जाते.