"जिम थॉर्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जिम थॉर्प हा एक अतिशय गरीब रेड इंडियन एक-दोन बुकं शिकलेला अमेरिकन...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
जिम थॉर्प हा(मृत्यू एक: अतिशय२८ गरीबमार्च,इ.स. रेड१०५३) इंडियनहा एक-दोन बुकंअतिशय गरीब शिकलेलाअशिक्षित अमेरिकन रेड इंडियन खेळाडू होता. मात्र मैदानावरच्या जबरदस्त आवडीतून समोर दिसेल तो खेळ खेळण्यात तो पटाईत झाला. खेळता खेळता तो डिकॅथलॉनसारख्या दहा खेळांच्या खेळीसाठी अमेरिकेच्या ऑलिंपिक पथकात निवडला गेला आणि त्याने १९१२ साली स्टॉकहोम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत जागतिक उच्चांकासह डिकॅथलॉन आणि पेंटॅथलॉनची सुवर्णपदके जिंकली.
 
==पारितोषिके परत घेतली==
जिम थॉर्पचा हा सन्मान वंशद्वेष्ट्या गौरवर्णीय अमेरिकन लोकांना सहन झाला नाही. त्यांनी थॉर्पकडे दुर्लक्ष केले. ऑलिंपिक स्पर्धेनंतर एक वर्षाने लोकांना समजले, की १९०९ आणि १९१० मध्ये बेसबॉलसारख्या त्या वेळी ऑलिंपिकशी संलंग्न नसलेल्या खेळाच्या लीग स्पर्धेत जिम थॉर्प एका स्थानिक क्‍लबकडून किरकोळ पैसे घेऊन खेळला होता. म्हणजेच तो धंदेवाईक खेळाडू होता. हा शोध लागताच शंभर टक्के सदस्य गौरवर्णीय असलेल्या अमेरिकन अॅथलेटिक संघटनेनं थोर्पवर नियमभंगाचा आरोप ठेवून त्याने मिळवलेली सर्व पारितोषिके परत घेतली आणि त्याची हेटाळणी केली.
 
==व्यावसायिक खेळाडू म्हणून यश==
त्यानंतर मात्र, थॉर्प सरळ सरळ व्यावसायिक खेळाडू म्हणूनच मैदानात उतरला. अनेक खेळातून त्याने अनेकानेक बक्षिसे पटकावली. मान-मरातबही मिळविला. रशियासह अनेक देशांत क्रीडा दौरे केले; पण गौरवर्णीय अमेरिकन त्याच्याकडे पाहायलादेखील तयार नव्हते.
 
==विसाव्या शतकातला सर्वोत्तम खेळाडू==
पुढे १०५० साली विसाव्या शतकातील पहिल्या अर्धशतकातला ‘सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून अमेरिकेच्या क्रीडा लेखक, क्रीडा पत्रकार यांच्या संयुक्त समितीने थॉर्पची निवड केली. त्यानंतर अमेरिकेभर त्याचे सत्कार झाले.
 
==मरणोत्तर सन्मान==
जेव्हा अमेरिकन सामान्य लोकांनी जिम थॉर्पला डोक्यावर घेतले तेव्हा अमेरिकन अॅथलेटिक्‍सचे अधिकारी नरमले. ऑलिंपिक समितीने सर्व अन्यायी निर्णय रद्द करून १३ ऑक्‍टोबर १९८२ रोजी थॉर्पने मिळविलेल्या दोन सुवर्णपदकांसह उच्चांकाची आणि अनेक प्रकारांची मानचिन्हे ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षांच्याच हस्ते त्याला त्याच्या कॅलिफोर्नियातील घरी जाऊन देण्यात आली. शेकडोंच्या संख्येत थॉर्पप्रेमी त्या वेळी उपस्थित होते; मात्र त्यावेळी थॉर्प यांच्या निधनाला तीस वर्षे होऊन गेली होती.
 
 
 
 
 
 
[[वर्ग:ऑलिंपिक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जिम_थॉर्प" पासून हुडकले