"पोलियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात किंवा पोलिओ या नावाने ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता सस्थेवर परिणाम करतो. लक्षणामध्ये सौम्य पक्षाघात विरहित किंवा पूर्ण पक्षाघात असे सर्व परिणाम या आजारामुळे काहीं तासात होतात.
 
वर्णन : एकूण तीन पोलिओच्या विषाणूमुळे पोलिओ होत असल्याचे माहीत आहे. एंटेरोव्हायरस या एकाच जातीमधील या विषाणूचे तीन प्रकार हे अन्नमार्गामधील विषाणू आहेत. टाइप वन या पोलिओ विषाणूमुळे आलेल्या साथीने बहुतेक रुग्णाना पक्षाघात होतो. एरवी हा विषाणू निरुपद्रवी मानवी परजीवी आहे.याचे संख्याशास्त्रीय अंदाज थोडे भिन्न आहेत. काहीं जणांच्या म्हणण्यानुसार दर २०० रुग्णांपैकी एकामध्ये पक्षाघाताची लक्षणे तर दुसऱ्या अंदाजानुसार दर १००० संसर्गापैकी एका रुग्णास विषाणू मध्यवर्ती चेता संस्थेपर्यंत पोहोचल्याने पक्षाघात होतो. जेंव्हा विषाणू मध्यवर्ती चेता संस्थमध्ये प्रवेश करतो तेंव्हा मज्जारज्जूमधील प्रेरक चेतापेशींच्या आवरणाला दाह होतो. प्रेरक चेतापेशी नष्ट होतात. यामुळे स्नायूकडे संवेद पाठविणे थांबते. स्नायूंकडे आलेले संवेद थांबल्यामुळे स्नायू आकुंचन पावणे थांबते. स्नायू शिथिल होतात. पोलिओमधील हा नेहमीचा प्रकार आहे. पोलिओ विषाणूमुळे किती चेतापेशी बाधित झाल्या आहेत त्यावर पक्षाघाताची तीव्रता अवलंबून आहे. बहुतेक वेळा अवयवांच्या स्नायूवर परिणाम होतो. पोटाचे आणि पाठीचे स्नायू बाधित झाले असल्यास उभे राहण्याची ढब बदलते. मानेच्या स्नायूवर परीणाम झाला असल्यास मान हलवणे आणि डोके उचलणे कठीण होते. चेहर्‍याच्या स्नायूंचा पक्षाघात असल्यास चेहरा वेडावाकडा होणे आणि पापण्या खाली पडणे असे परिणाम दिसतात. घशाचा पक्षाघात झाल्यास श्वासोच्छ्वास थांबून मृत्यू ओढवतो.
 
पोलिओ विषाणूचा मानव हा एकमेव पोषिता आहे. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. पण पोलिओ प्रौढाना होऊ शकतो. पोलिओचे कारण दाट लोकवस्ती आणि निकृष्ट राहणीमान व स्वच्छतेचा अभाव हे आहे. अशा वातावरणात पोलिओ सहज पसरू शकतो. पोलिओचा धोका वृद्ध, गरोदर महिला, प्रतिकारा शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, नुकत्याच टॉन्सिल काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती याना अधिक असतो.
 
==संशोधन==
पोलिओच्या विषाणू (व्हायरस)चे तीनही प्रकारचे जिवाणू हे ’आरएनए‘वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात. त्यामुळे हातांपायांतील शक्ती जाऊन अपंगत्व येते. तिन्ही विषाणू फक्त मानवाला घातक आहेत. प्राण्यांना पोलिओ (आणि देवीच्या) विषाणूंचा काही त्रास होत नाही. फ्रॅंकलिन रुझव्हेल्ट हे १९३३ ते १९४५ सालापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी पोलिओच्या संशोधनासाठी प्रोत्साहन आणि निधी उपलब्ध करून दिला. ते स्वतःच पोलिओग्रस्त होते आणि तेथे त्याकाळी पोलिओग्रस्तांचे प्रमाण खूप होते. पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी १९५१मध्ये पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली. त्यांच्या लशीमध्ये पूर्णत: निष्प्रभ विषाणू होते. अल्बर्ट सॅबिन यांनीही न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये १९६१मध्ये पोलिओची लस तयार केली. त्यामध्ये तिन्ही प्रकारचे, पण अर्धवट विकलांग, क्षीण विषाणू होते. ही लस "टोचावी‘ लागत नव्हती. ती चवीला गोड होती. तिचे दोन थेंब तोंडाने घ्यायचे होते. त्यासाठी डॉक्‍टरांची उपस्थिती गरजेची नव्हती.
 
भारतातील प्रशिक्षित स्वयंसेवक बालकांना लशीचे दोन थेंब देत असे. मुख्य म्हणजे या लशीचा प्रभाव जन्मभर टिकणारा आहे. पल्स पोलिओचा डोस द्यायच्या दिवशीच काही बालके रेल्वे आणि बसच्या प्रवासात असत. अशा वेळी स्वयंसेवक गाडीत शिरून चटकन पोलिओच्या लशीचे थेंब बालकांच्या जिभेवर ठेवायचे. एकूण पाच डोस द्यायची योजना होती. त्यात खंड पडू नये, म्हणून उत्साही तरुण स्वयंसेवकांनी मनोभावे या मोहिमेत भाग घेतला. सव्वाशे कोटी लोकसंख्या, अस्वच्छता, पाणीटंचाई, अंधश्रद्धेचा पगडा, खडतर हवामानाचे उंच-सखल भूभाग, पर्वतीय-वाळवंटी प्रदेश असे अडथळे पार करून भारत पोलिओमुक्त झालाय. जगातील ८० टक्के नागरिक आता "पोलिओविरहित‘ देशांमध्ये राहतात.
 
==कारणे आणि लक्षणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलियो" पासून हुडकले