"पृथ्वीराज चौहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Prithviraj Chauhan was killed by Ghori.After 14 years Ghori was murdered..
No edit summary
ओळ २:
 
महाराज '''पृथ्वीराज चौहान''' हे [[दिल्ली]] येथील पराक्रमी राज्यकर्ते होते. [[भारतीय इतिहास|भारतीय इतिहासातील]] पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. महाराज पृथ्वीराज चौहान यांनी [[मोहम्मद घौरी]]चा सोळा वेळा पराभव केला व प्रत्येक वेळी त्याला जीवदान दिले परंतू [[कनौज|कन्नौजचे]] महाराज [[जयचंद]] यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सुडापोटी गझनीचा [[मोहम्मद घौरी]] या परकीय आक्रमणकर्त्याशी हातमिळवणी करून सरतेशेवटी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली व महाराज पृथ्वीराज चौहान यांना कैद केले.
 
कैदेमध्ये असताना क्रुर महंमद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचे डोळ्यांमध्ये तप्त लाेखंडी सळ्या घालून डोळे फोडले गेले. पृथ्वीराज चौहान व त्यांचा सेवक यांनी महंमद घोरीचा सुड घेण्यासाठी योजना बनविली व त्या योजनेनुसार सेवकाने महंमद घोरीला महाराज पृथ्वीराज चौहान यांचेकडे असलेले बाणाने शब्दभेदी लक्ष भेदण्याचे कसब आहे ते पाहण्याची विनंती केली. त्यानुसार सेवकाचे सुचनेप्रमाणे दिवस ठरला व दरबारामध्ये त्याचे प्रात्यक्षिक आयोजित केले गेले. त्यानुसार महंमद घोरी उंच सिंहासनावर बसला होता व त्याच्या बरोबर समोर उंचावर फिरता मासा लावलेला होता आणि पृथ्वीराज चौहान दरबारामध्ये खाली उभे राहणार होते व त्यांना आवाज करणारा फिरता माशाचे लक्ष भेदावयाचे होते व नियोजनानुसार लक्ष भेदण्यासाठी महंमद घोरी आदेश देणार होता. सेवकाने दरबाराचे वर्णन महाराजांना सांगितले होते. व माशाच्या बरोबर मागे महंमद घोरी असेल महंमद घोरीने आदेश देताच तुम्ही मागे वळून महंमद घोरीच्या दिशेने शब्दभेदी बाण मारून त्याचा बध करण्याबाबत सर्व इत्थंभूत माहिती दिली.
 
दुस-या दिवशी ठरल्याप्रमाणे घोरी दरबारात आला तसेच पृथ्वीराज चौहान यांना देखील दरबारात आणले गेले. व त्यांना मागे असलेल्या माशाकडे तोंड करून उभे केेले गेले. पृथ्वीराज चौहानांना तयार राहण्यास सांगितले त्यानुसार महाराजांना बाण धनुष्याला लावून माशावर नेम धरून तयार झाले. आता प्रतिक्षा होती ती बाण मारण्यासाठी महंमद घोरीच्या आदेशाची. सरतेशेवटी महंमद घोरीने बाण मारण्याचा आदेश देताच महाराज पृथ्वीराज चाैहानांनी क्षणात मागे पिरून घोरीच्या कंठातून निघालेल्या आवाजाच्या दिशेने शब्दभेदी बाण सोडला आणि तो बाण घोरीच्या कंठातून आरपार झाला. अशा प्रकारे पृथ्वीराज चौहान यांनी दुष्‍ट, अन्यायी, क्रूर, लुटारू महंमद घोरीचा बध केला.
 
[[वर्ग:भारतीय सेनानी]]