"अल्बर्ट आइन्स्टाइन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २२:
[[File:Albert Einsteins signature.JPG|Albert Einsteins signature]]
}}
'''अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन''' (मराठी लेखन - अल्बर्ट आईन्स्टाईन), ([[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Albert Einstein'' ;) ([[मार्च १४]], [[इ.स. १८७९]] - [[एप्रिल १८]], [[इ.स. १९५५]]) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. [[सापेक्षतावादाचा सिद्धान्त]], ([[सापेक्षतावादाचा विशेष सिद्धान्त|विशेष सिद्धान्त]], [[सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त|सामान्य सिद्धान्त]]), [[प्रकाशीय विद्युत परिणाम]], [[पुंजभौतिकी]], [[विश्वशास्त्र]], [[विश्वरचनाशास्त्र]] वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी [[प्रकाशीय विद्युत परिणाम]] या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" [[इ.स. १९२१]] साली त्यांना [[नोबेल पुरस्कार]] देऊन "सन्मानित" केले गेले नाही. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहर्‍यांपैकी एक बनले. "आइन्स्टाइन" या नावाचा अनेक ठिकाणी वापर (आणि/किंवा गैरवापर) होऊ लागला. त्या प्रकारांमुळे वैतागलेल्या आइन्स्टाइन यांनी "अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन" ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाइन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी आइन्स्टाइन याने विचार केला की, [[न्युटनी यांत्रिकी]] ही [[विद्युत चुंबकीय]] नियमांसोबत [[पारंपारिक यांत्रिकी|पारंपरिक यांत्रिकीच्या]] नियमांशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या [[विशिष्ट सापेक्षता सिद्धान्त|विशिष्ट सापेक्षता सिद्धान्ताला]] चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटू लागले की, सापेक्षतेचे तत्त्व हे [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणाचेच]] सुधारित आणि विस्तारित रूप आहे. त्यांनी १९१६ साली त्यांच्या [[अनुवर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्त|अनुबर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्तावरून]] सामान्य सापेक्षता सिद्धान्तावर एक पेपर प्रकाशित केला. [[सांख्यिकीय यांत्रिकी]] आणि पुंजयांत्रिकी सिद्धान्त यांच्या समस्यांची उकल करण्यायास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या [[आण्विक|आण्विक सिद्धांत]] आणि [[ब्राउनिअन गती |रेण्विक गती]] या संबंधित सिद्धान्त स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी [[प्रकाशाचा औष्णिक गुणधर्म|प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा]] शोध लावल्यामुळे त्यांना [[प्रकाशकणांचा सिद्धान्त]] मांडता आला. १९१७ साली, आईन्स्टाइन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली.<ref>[http://www.nobelprize.org/nobel_prizes/physics/laureates/2011/advanced-physicsprize2011.pdf "Scientific Background on the Nobel Prize in Physics 2011. The accelerating universe." (page 2)] Nobelprize.org.</ref>
 
त्यांनी अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा म्हणजे १९३३ साली, जर्मनीत [[ॲडॉल्फ हिटलर]] सत्तेवर आला आणि त्यामुळे आइन्स्टाइन यांनी ते पूर्वी जिथे प्राध्यापक होते त्या [[प्रशियन विज्ञान महाविद्यालय।बर्लिन विज्ञान अकादमी]] येथे परत जाण्यास नकार दिला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. १९४० मध्ये त्यांना [[अमेरिकेचे नागरिकत्व]] मिळवले. <ref>{{cite web |url=http://www.einstein-website.de/z_information/variousthings.html |title=Various things about Albert Einstein |last=Hans-Josef |first=Küpper |year=2000 |publisher=einstein-website.de |accessdate=July 18, 2009}}</ref>
दुसर्‍या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला, आइन्स्टाइन यांनी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष [[ फ्रँकलिन डी. रूझवेल्ट]] यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी आवाहन केले होते की, रूझवेल्ट यांनी तत्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर अणुबॉम्ब यांची निर्मिती थांबवावी. परंतु त्या पत्राची दखल न घेता अमेरिकेने [[मॅनहॅटन प्रकल्प]] उभारला. आइन्स्टाइन यांचा सैन्याच्या संरक्षण-धोरणाला पाठिंबा होता, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या [[अणुकेंद्राचे विभाजन]] या तत्त्वावर चालणार्‍या शस्त्रांचा निषेध केला. काही काळानंतर आइन्स्टाइन यांनी ब्रिटिश तत्त्वज्ञ [[बर्ट्रांड रसेल ]] यांच्याशी संपर्क साधून [[रसेल-आइन्स्टाइन जाहीरनामा]] यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रांचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते. आइन्स्टाइन हे अमेरिकेतील [[प्रिन्स्टन,न्यू जर्सी]] या शहरातील [[इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी]] या शिक्षण संस्थेशी शेवटपर्यंत संलग्न राहिले. १९५५ साली आइन्स्टाइन यांचे निधन झाले.
 
आइन्स्टाइन यांनी सबंध आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक शोधनिबंध आणि १५० गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले आहेत. <ref>"Paul Arthur Schilpp, editor 1951 730–746">{{Citation |author=Paul Arthur Schilpp, editor |year=1951 |title=Albert Einstein: Philosopher-Scientist, Volume II |publisher=Harper and Brothers Publishers (Harper Torchbook edition) |location=New York |pages=730–746}}His non-scientific works include: ''About Zionism: Speeches and Lectures by Professor Albert Einstein'' (1930), "Why War?" (1933, co-authored by [[Sigmund Freud]]), ''The World As I See It'' (1934), ''Out of My Later Years'' (1950), and a book on science for the general reader, ''[[The Evolution of Physics]]'' (1938, co-authored by [[Leopold Infeld]]).</ref>त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिर्‍या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे [[अलौकिक बुद्धिमत्ता]] या अर्थाने आइन्स्टाइन हा शब्द वापरला जाऊ लागला. <ref>[http://wordnetweb.princeton.edu/perl/webwn?s=Einstein WordNet for Einstein].</ref>
 
== चरित्र ==