"लॉगॅरिदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
गणितामध्ये '''लॉगॅरिदम''' (Logarithm) ही [[घातांक|घातांकाच्या]] विरुद्ध क्रिया आहे. स्कॉटिश गणितज्ञ जॉन नेपियर यांनी सुचविलेल्या या युक्तीमुळे गुणाकार-भागाकार, वर्ग-घन करणे वर्गमूळ-घनमूळ काढणे आदी क्रिया सोप्या झाल्या. लॉगॅरिदममुळे गुणाकार आणि भागाकार यांसारख्या तुलनेने क्लिष्ट क्रियांना बेरीज आणि वजाबाकी यासारख्या सोप्यासहज करता येण्यासारख्या गणिती क्रियांमध्ये बदलता येऊ शकते. एखाद्या संख्येचा लॉगॅरिदम म्हणजे एक हा अंक सोडून दुसऱ्या कोणत्याही आधारांकावर (बेस-bवर) कोणता [[घात-x]] चढवल्यावर ती संख्या मिळते तो अंक. उदाहरणार्थ, आधारांक १० चा तिसरा घात म्हणजे १००० (१०<sup>३</sup> = १० x १० x १० = १०००). म्हणून, १००० चा १० आधारांकी लॉगॅरिदम ३ आहे. घातांकीकरण (एक्सपोनेन्शिएशन) या क्रियेमध्ये कोणत्याही धन [[वास्तव संख्या|वास्तव संख्येचा]] वास्तव घात काढता येतो व तो नेहमी धन असतो, म्हणून ''b'' आणि ''x'' सारख्या कोणत्याही धन वास्तव संख्या वापरून लॉगॅरिदम काढता येतो. (येथे ''b'' बरोबर १ नाही.) ''x'' या संख्येचा ''b'' आधारांकी लॉगॅरिदम log<sub>''b''</sub>(''x'') असा दर्शवला जातो, व तो ''y'' या अद्वितीय संख्येइतका असतो;
:''b''<sup>''y''</sup> = ''x''.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लॉगॅरिदम" पासून हुडकले