"लॉगॅरिदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: गणितामध्ये '''लॉगॅरिदम''' (Logarithm) घातांकाच्या व्यस्त क्रिया...
(काही फरक नाही)

०२:५४, १६ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

गणितामध्ये लॉगॅरिदम (Logarithm) घातांकाच्या व्यस्त क्रिया आहे. स्कॉटिश गणितज्ञ जॉन नेपियर यांनी प्रतिपादीत केलेल्या या क्रियेमुळे अनेक गणनांना सोपे केले जाऊ शकते. लॉगॅरिदममुळे गुणाकार आणि भागाकार यांसारख्या तुलनेने क्लिष्ट क्रियांना बेरीज आणि वजाबाकी यासारख्या सोप्या क्रियांमध्ये बदलता येऊ शकते. एखाद्या संख्येचा लॉगॅरिदम म्हणजे दुसऱ्या एका निश्चित संख्येचा, आधारांकाचा (बेस), निश्चित घात जो चढवल्यावर तो क्रमांक मिळेल. उदाहरणार्थ, १००० चा १० आधारांकाचा लॉगॅरिदम ३ आहे, कारण १० चा तिसरा घात म्हणजे १००० (१० = १० x १० x १० = १०००). घातांकीकरण (एक्सपोनेन्शिएशन) या क्रियेमध्ये कोणत्याही धन वास्तव संख्येचा वास्तव घात घेतला जाऊ शकतो व तो नेहमी धन असतो, म्हणून लॉगॅरिदम कोणत्याही धन वास्तव संख्या b आणि x साठी काढला जाऊ शकतो, जिथे b बरोबर १ नाही. x या संख्येचा b आधारांकाचा लॉगॅरिदम logb(x) असा दर्शवला जातो, व तो y या अद्वितीय संख्येइतका असतो;

by = x.

उदाहरणार्थ, ६४ = २, म्हणून,

log(६४) = ६

म्हणजे ६४ चा २ आधारांकाचा लॉग (log) बरोबर ६.

लॉगॅरिदममधील नियम

गुणाकाराचा लॉगॅरिदम म्हणजे गुणाकारातील संख्यांच्या लॉगॅरिदमची बेरीज; भागाकाराचा लॉगॅरिदम म्हणजे त्यातील संख्यांची वजाबाकी; एखाद्या संख्येच्या "प"-व्या घाताचा लॉग म्हणजे प गुणिले त्या संख्येचा लॉग आणि एखाद्या संख्येच्या "त"-व्या घातमूलाचा लॉग म्हणजे त्या संख्येचा लॉग भागिले "त".

सुत्र उदाहरण
गुणाकार    
भागाकार    
घातांक    
घातमूल