"वसंत आजगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''वसंतराव आजगावकर''' हे एक मराठी भावगीत गायक आणि संगीतकार आहेत. ते [[डोंबिवली]]त राहतात.
 
गिरगावात जन्मलेले वसंतराव वयाच्या पाचव्या वर्षी डोंबिवलीत राहायला आले. तेथे स. वा. जोशी विद्यालयात त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे ते माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये शिकले. डोंबिवलीतील पं. एस. के. अभ्यंकर यांच्याकडे वसंतरावांनी संगीताचे शिक्षण घेतले. १९५८ च्या सुमारास त्यांनी आकाशवाणीवरून गाण्यास सुरुवात केली.
 
[[सुधीर फडके]] यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव 'संपूर्ण गीतरामायण' हा कार्यक्रम करू लागले. हिंदीत भाषांतरित झालेल्या गीतरामायणाचे असंख्य कार्यक्रम त्यांनी केले. त्याशिवाय वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांमधून गायक-संगीतकार वसंतराव आजगावकर रसिकांना सतत भेटत राहिले आहेत. त्यांनी दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनौ, हैदराबाद, बेंगलोर, अहमदाबाद, बडोदा, कलकत्ता या ठिकाणीही अनेक कार्यक्रम केले आणि आपला वेगळा रसिकवर्ग तयार केला. त्यांनी आजवर त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत हजारांहून अधिक गीतगायनाचे कार्यक्रम केले आहेत.
 
==वसंत आजगावकरांनी केलेले सार्वजनिक कार्यक्रम==
* आचार्य अत्रे विरचित 'झेंडूची फुले'मधील विडंबन कवितांचे साग्रसंगीत गायन
* श्रीगजानन गीतांजली
* गीत रामायण (मराठी-हिंदी)
* गुरुचरित्रावर आधारित गीतदत्तात्रेय
* संत नामदेवरचित ज्ञानेश्वर समाधीच्या अभंगांचा 'अवस्था लावोनि गेला' हा कार्यक्रम
* व्यासरचित महाभारतावर आधारित गीतमहाभारत (पहिला कार्यक्रम १९७०मध्ये)
* शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतशिवायन
* मर्ढेकरांच्या कवितांचा एक नादानुभव हा कार्यक्रम
* श्रीरामचरितमानसचे गायन
* रामदास म्हणे
* [[विंदा]]ंची प्रेमगाणी
* श्रीसाई चरित्रगान
* सावरकर दर्शन
* हिंदी भजनांच्या गायनांचा 'संतोंकी बानी' हा कार्यक्रम
 
==गाणी==