"करसनदास मुळजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: करसनदास मुलजी (जन्म १८३२ मृत्यू १८७५) हे एक भारतीय पत्रकार होते. ए...
(काही फरक नाही)

२०:०४, ३१ मार्च २०१६ ची आवृत्ती

करसनदास मुलजी (जन्म १८३२ मृत्यू १८७५) हे एक भारतीय पत्रकार होते. एकोणिसाव्या शतकात १८५७ च्या बंडानंतर थोड्याच दिवसात इंग्लंडला जाऊन तिथल्या प्रवासाच्या गुजरातीत केलेल्या वर्णनाकरता ते ओळखले जातात. हे त्यांचे पुस्तक १८६५ साली प्रकाशीत झाले. या त्यांच्या प्रवासवर्णनाचा भास्कर हरी भागवत यांनी केलेला मराठी अनुवाद १८६५ साली “इंग्लंडातील प्रवास” या नावाखाली प्रकाशीत झाला. हे मराठी भाषेतील पहिले प्रवासवर्णन म्हटले जाते. याशिवाय मुलजी “सत्यप्रकाश” नावाचे नियतकालिक चालवत असत. विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनात व तत्कलीन संस्थानिकांच्या भ्रष्टाचाराविरूद्धदेखील मुलजी यांनी लिखाण केले आहे.