"व्यंकटेश दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
'''व्यंकटेश दिगंबर माडगूळकर''' ([[जुलै ६]], [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ऑगस्ट २८]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]] आणि [[चित्रकार]] होते. त्यांनी कथा, कादंबर्‍या, प्रवासवर्णनांसह [[चित्रपट|चित्रपटांसाठी]] पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद हॊता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.
 
व्यंकटेश माडगूळकर हेयांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार [[ग.दि. माडगूळकर]] यांचे हे धाकटे बंधू हॊतहोत.
 
आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत.
 
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.
 
व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. 'कोवळे दिवस' ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत.
 
'पुढच पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line ५४ ⟶ ६२:
* पांढर्‍यावर काळे
* पारितोषिक
* पुढचं पाऊल
* प्रवास एक लेखकाचा
* [[माणदेशी माणसं]]
* मी आणि माझा बाप
* [[बनगरवाडी]]
* बाजार
* बिकट वाट वहिवाट
Line ६३ ⟶ ७२:
* वारी
* वाळूचा किल्ला
* व्यंकटेश माडगूळकर यांची कथा : माणदेशी व्यक्ती व गावाकडचे किस्से, आत्मवृत्तपर व त्याचबरोबर स्वत:च्या लेखनावरील, निसर्गपर व जनावरांसंबंधीच्या, शिकारीच्या, शेतकर्‍याच्या, भुताखेताच्या, तमासगिरांच्या, स्त्रीजीवनावर, शहरी समस्येच्या - अशा सर्व धर्तीच्या निवडक २५ कथांचा संग्रह (संपादक - अरविंद गोखले)
* सती
* [[सत्तांतर]]
* सरवा
* सीताराम एकनाथ