"थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५०:
 
बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून [[मुंगीपैठण]] येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, [[नर्मदा]] तीरावर [[रावेरखेडी]] या गावी [[विषमज्वर|विषमज्वराने]] २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्त्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ [[घोडा|घोडे]] होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते. फक्त ४०वर्षांच्या जीवनात ४७ लढाया जिंकल्या. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.
 
बाजीराव राजवटीतील मराठा साम्राज्याचा विस्तार
File_Historical_map_of_India_AD_1720
 
==थोरल्या बाजीरावांची मुद्रा==