"ब्रह्मानंद देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो (शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती)
ब्रह्मानंद देशपांडे हे मूळचे [[वाशीम]] जिल्ह्यातले. [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एक ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ता म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या देशपांडे यांचे प्राचीन [[भारतीय इतिहास]], [[संस्कृती]] व [[पुरातत्त्वशास्त्र]] विषयातील पदव्युत्तर शिक्षण [[नागपूर]] आणि [[मध्य प्रदेश]]ातील [[सागर]] येथे झाले. महाराष्ट्रातील [[शिलालेख]] - ताम्रपटांचा अभ्यास करून नागपूर विद्यापीठातून आधुनिक इतिहास या विषयात त्यांनी डॉक्‍टरेट संपादन केली होती.
 
ब्रह्मानंद देशपांडे यांनी [[पैठण]], [[औरंगाबाद]] आणि नागपूर येथील महाविद्यालयांत इतिहास हा विषय शिकवत होतेशिकला. त्यांनी औरंगाबाद येथील सरस्वती महाविद्यालयात सलग ३१ वर्षे अध्यापनाचे काम केले. शिक्षणाबरोबरच इतिहास संशोधनात उतरलेल्या देशपांडे यांनी पुढे महाराष्ट्रातील [[सातवाहन]]पासून ते मराठ्यांच्या कालखंडांचा मोठा अभ्यास केला. या बरोबरच [[अजिंठा-वेरूळची लेणी]], पैठण, सातवाहन समाज, महानुभाव पंथ, संतवाङ्‌मय, [[कवी]] भूषण हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते.
 
वेरूळ आणि अजिंठा लेण्यांचे ते भाष्यकार होते. आजपर्यंत हजारो पर्यटकांना अजिंठय़ाची चित्रसृष्टी आणि वेरूळचे शिल्पवैभव यांचे दर्शन त्यांनी घडविले.
मिळाला आहे.
 
[[मराठी]], [[हिंदी]], [[इंग्रजी]]शिवाय [[संस्कृत]], [[गुजराती]], [[कन्नड]], [[बंगाली]], [[उर्दू]], बुंदेलखंडी आणि छत्तीसगढी अशा दहाहून अधिक भाषांवर देशपांडे यांचे प्रभुत्व होते. महाराष्ट्रातील बहुतांशबऱ्याच बोलीभाषा त्यांना अवगत होत्या. [[ब्राह्मी]], [[फारसी]], [[मोडी]] लिपीचे ते तज्ज्ञ होते.
 
ब्रह्मानंद देशपांडे यांचे वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय परिषदांमधून दीडशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. शेकडो लेख, स्मरणिकांचे संपादन व प्रकल्पांमधील सहभाग त्यांच्या नावावर जमा आहेत.
महानुभाव या मासिकाचे ते कार्यकारी संपादक होते.
 
आकाशवाणीवर रुपकेरूपके आणि परीक्षणहीपरीक्षणणही त्यांनी सादर केली आहेत. महानुभाव आणि जैन या साहित्याचे डॉ. देशपांडे हे अभ्यासक होते. ओजस्वी वक्ता, विद्यार्थीप्रियविद्यार्थिप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती.
 
देशपांडे यांचे ३४ संशोधनपर ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतल्या काहींची ही नावे :-
* चक्रपाणी-चिंतन
* दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १ ते ४
* [[देवगिरीचे यादव]]
* रत्‍नमाला स्तोत्र
* रत्‍नशाळा पूर्वार्ध
५७,२९९

संपादने