"इसाक मुजावर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचा माहितीकोश समजले जाणारे इसाक मुजावर (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९३४; मृत्यू : मुंबई, २६ फ़ेब्रुवारी, २०१५) हे एक मराठी लेखक होते. ते [[डोंबिवली]]त रहात असत..
 
बाळकृष्ण दांडेकर, मदन शारंगपाणी अशा काही [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावांनीही]] त्यांनी लेखन केले.
 
सिनेपत्रकार म्हणून फिल्म इंडिया मासिकाचे संपादक [[बाबूराव पटेल]] यांनी १९४० च्या दरम्यान चित्रपटसृष्टीवर लालित्यपूर्ण लिखाण करायला सुरुवात केले. त्यांचा बराच दबदबा होता; परंतु मराठी आणि हिंदी चित्रपटांनी खरी गती घेतली ती १९५०-६० या काळातच. या काळात आलेले चित्रपट पाहिलेली पिढी आज सुवर्णक्षण आठवत दिवस कंठीत आहे. इसाक मुजावर यांचे मामा हे भालजी पेंढारकर यांच्याकडे तबलावादक म्हणून काम करीत. वडिलांचे निधन झाल्यावर इसाक यांचे शिक्षण मामांकडेच झाले. त्यांची आई शिक्षिका होती. जेमतेम १०वीपर्यंत शालेय शिक्षण घेतल्यानंतर इसाक यांनी फिल्मी दुनियेत मामासोबत वावरत असतानाच १९४६ ला ‘तारका’ या चित्रपटविषयक मासिकात आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला. स्वातंत्र्यापूर्वी दोन वर्षे त्यांचा त्या 'तारका' सिनेसाप्ताहिकात राज कपूरच्या वाल्मीकी या चित्रपटासंदर्भात वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्रवजा लेख छापून आला. तेव्हापासून ते चित्रपटांवर अखंड लिहीत आहेत. त्यांची २०१४ सालापर्यंत पन्नासेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विषय सुचला की त्याची व्याप्ती, आखणी, मांडणी, बाज, स्वरूप, शब्दांची निवड व चपखल वापर या भानगडींना मुजावरांच्या लेखनजीवनात स्थान नाही. त्यांच्यापाशी असलेला माहितीचा डोंगर त्यांना स्टार्ट टु फिनिश घेऊन जात असे. एकदा विचार डोक्यात आला की लेख किंवा पुस्तकही लिहून झाल्यात जमा असे.