"गणपती वासुदेव बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|अनिल विश्वास}}
 
'''गणपती वासुदेव बेहेरे''' ([[सप्टेंबर १९]], [[इ.स. १९२२]] - [[मार्च ३०]], [[इ.स. १९८९]]) हे मराठी लेखक आणि झुंझार पत्रकार होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या [[सोबत (साप्ताहिकनियतकालिक)|सोबत]] नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण ''अनिल विश्वास'' या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात ''कटाक्ष'' आणि ''गवाक्ष'' ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत.
 
ग.वा. बेहेरे पत्नीचे नाव शशिकला बेहेरे होते. यांच्या, वडिलांचे नाव रावसाहेब वासुदेव विनायक बेहेरे आणि आईचे सावित्रीबाई होते. रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. वडीलते इंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या ''इरिगेशन मॅन्युअल'' या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे.
 
ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण [[पुणे|पुण्याच्या]] गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक [[नूतन मराठी विद्यालय|नूतन मराठी विद्यालयातून]] झाले. शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुराम कॉलेजात]] गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या ''परशुरामियन'' नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची ''गोमंतकाचे अश्रू'' नावाची कथा छापली गेली होती.