"प्रभा गणोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
ऊन वेचता वेचता कशी झाली संध्याकाळ, घन सांधायला जाता सारे संपले आभाळ.<br/>
स्वत:च्या भावना, स्वत:चे शब्द असलेली ही साधी अष्टाक्षरी छंदातली, आठ ओळींची कविता त्यांनी घरी येऊन लिहून काढली. ही पहिली कविता. त्यामुळेच पुढेही त्यांनी प्रचंड कविता वाचली पण अनुकरण कधीही करायची इच्छा झाली नाही. त्याचबरोबर अगदी अनावर उत्कटपणे काही जाणवले तरच ते शब्दांतून येऊ लागले.
 
==तरुणपणातील कविता==
जेमतेम विशीत असलेल्या प्रभा गणोरकर या शिक्षण, आई-वडील, बहीण, भाऊ, गावातले घर यांच्यात पूर्णपणे मग्न होत्या. माझचे अनुभवविश्वच तेव्हा फार मर्यादित होते, त्याविषयी काही लिहावे असे ते नव्हते. १९६१ते ६५-६६ या काळात त्यांनी दहाएक कविता लिहिल्या असतील. त्यातल्या दोन-तीन आज शिल्लक आहेत.
 
एकदा मात्र असे झाले, की त्यांनी त्यांच्या लहान भावाला श्रीकृष्णाचा मृत्यू आणि द्वारका बुडणे ही महाभारतातली गोष्ट सांगितली. तो झोपी गेल्यावर प्रभा गणोरकरांनी कागद समोर ओढला आणि द्वारका ही कविता लिहून काढली. ही कविता कमीत कमी शब्दांत तर लिहिली गेलेलीच आहे, पण त्यात शब्दही फार नेमके अवतरले आहेत.<br/>
'''पाणी हलले थोडे दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा'''<br/>
'''खोल आतल्या आत गुदमरले हुंदके सारी निरवानिरव करावी लागली तेव्हा'''.<br/>
या ओळींत ‘पाणी हलले थोडे’ यातला ‘हलले’ हा शब्द केवळ क्रिया सुचवणारा नाही, तर भाव सुचवणारा आहे. बुडत चाललेल्या द्वारकेला पाहून श्रीकृष्णाच्या नशिबी आलेले ही अनुभूती कुणाच्याही वाट्याला आलेली असू शकते.
 
या कवितनंतर प्रभा गणोरकर यांचे नियमित काव्यलेखन सुरू झाले. 'द्वारका' ही त्यांची आवडती कविता आहे.
 
==प्रभा गणोरकर यांनी लिहिलेली पुस्तके==