"माधव मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
मजकूर विस्तार व दुवे जोडले ~~~~
ओळ १:
{{विस्तार}}
'''माधव मनोहर''' (जन्म : नाशिक, २० मार्च, [[इ.स. १९११|१९११]] - २३ मे, इ.स. १९९४) (मूळ नाव माधव मनोहर वैद्य) हे [[मराठी भाषा|मराठी]] समीक्षक, नाटककार, लेखक होते. ते बी.ए. असले तरी मुंबईतील एस.एन..डी.टी. कॉलेजात प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. चित्रपट समीक्षक व लेखक [[गणेश मतकरी]] हे त्यांचे नातू आहेत.<ref>आमचं घर : गणेश मतकरी, लोकसत्ता, दि. २३ मार्च २०१४, http://www.loksatta.com/vasturang-news/our-house-409279/, १८ मार्च २०१६ रोजी पाहिले.</ref>
 
इंग्रजी वाङ्‌मय वाचल्यावर माधव मनोहर यांना मराठी साहित्य आणि मराठी नाटक खूपच खुजे आणि परावलंबी असल्याची जाणीव झाली. येथूनच पुढे माधव मनोहर या समीक्षकाचा उदय झाला. इंग्रजीतले चांगले वाङ्‌मय मराठीत आणण्याचा त्यांनी सपाटा लावला. दैनिक केसरीत ’चौपाटीवरून’ या सदरात, ’सोब” मध्ये ’पंचम सदरातून नाट्यसमीक्षण करीत असत. तसेच ’नवशक्ती’, ’रत्‍नाकर, ’रसरंग’मधूनही ते समीक्षालेख लिहीत असत. त्यांचे स्वतःचे जेवढे साहित्य आहे त्यापेक्षा त्यांचे समीक्षासाहित्य अधिक आहे, त्यामुळे माधव मनोहर हे नाव साहित्यिकांच्या पंक्तीतून समीक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसले.