"ब्राह्मण (वर्ण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
 
== गोत्रे आणि प्रवरे ==
गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत. बौधायनसूत्रानुसार [[अगस्त्य]], [[कश्यप]], [[गौतम]], [[जमदग्नी]], [[भारद्वाज]], [[वसिष्ठ]] आणि [[विश्वामित्र]], या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रेvffगोत्रे तयार होतात.{{संदर्भ हवा}}
 
गोत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसारfश्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, कुंदिन, पराशर आणि वसिष्ठ. या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे इंद्रप्रमाद भारद्वसू व वसिष्ठ; पराशर गोत्रातील प्रवरे पाराशर्य, वसिष्ठ व शाक्त्य; कुंदिनकुंvदिन गोत्राची कौंडिण्य, मैत्रात्रवरुण व वसिष्ठ ही होत.{{संदर्भ हवा}}
 
प्रवरे दोन प्रकारची असतात: १> शिष्य-प्रशिष्य-ऋषी-परंपरा आणि २> पुत्रपरंपरा.