"भायखळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
’ई’ वॉर्ड कार्यालयापुढे चालत गेल्यास ’साखळी इस्टेट’ नावाचा संपूर्ण मुस्लिम बहूल परिसर आढळतो. स्थानिकांकडून या नावाचा ’सांकली इस्टेट’ असा उच्चार केला जातो. साखळी इस्टेटच्या पहिल्या गल्लीत मी उजव्या बाजूने शिरलो. आजुबाजूला उर्दू भाषेतील पाट्या लक्ष वेधून घेतात. येथील इमारती ह्या दु-तीमजली आहेत. बांधकाम जुन्या पद्धतीचे आणि परिसर काहीसा अस्वच्छ आहे. येथील घरे ही अरुंद आणि फार चिंचोळ्या आकाराची आहेत. स्थानिकांकडून भायखळा आणि या परिसराच्या इतिहासाविषयी जाणून घेतले असता १९४० सालच्या सुमारास हा परिसर फार कमी दाटीवाटीचा होता असे कळाले. त्या सुमारास ह्या परिसरात ट्राम चालत असे. सुरुवातीस हा भाग ख्रिश्चनबहूल होता या भागाच्या एकूण लोकसंख्येच्या १/३ लोकसंख्या ही ख्रिश्चन धर्मीय होती. नंतर मात्र कुटुंबातील सदस्य संख्या वाढू लागल्याने ख्रिश्चन धर्मिय हा परिसर सोडून उपनगरांत जाऊ लागले. या परिसरात राहणारा मुस्लिम आणि हिंदू हा गिरण्यांमधे काम करणारा कामगार होता. सुशिक्षित ख्रिश्चन हा बँका, शाळा वगैरे कार्यालय़ांत काम करत होता तर अशिक्षित ख्रिश्चन हा श्रीमंत ख्रिश्चनांकडे घरकाम करत होता. भायखळ्यात पहिले फिनिक्स, इंडिअन, गार्डन, ब्रॅडबरी, सिंप्लेल्स, शक्ती या कापड गिरण्या होत्या. रस्ते फार चांगले नव्हते पण मुंबई-आग्रा रोड रहदारीचा मुख्य रस्ता होता. नाले पुर्वी पाण्याने साफ केले जात असत आता मात्र स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसतो. मौलाना आझाद रोड, जेकब सर्कल, भायखळा ब्रिज, नागपाडा हे पहिले वस्तीचे प्रमुख परिसर होते. भायखळ्याला अन्न-धान्याचा पुरवठा हा पुणे, नाशिक, येथून होत असे. किंग्सले डेविसची ’एस कर्व’ ही संकल्पना भायखळ्याच्या बाबतीत लागू पडते. औद्योगिकरण झाल्यानंतर प्रामुख्याने शहरीकरण झालेले दिसते. मात्र गिरण्या बंद पडल्यानंतर पुन्हा कर्वची गती कमी झालेली आढळून येते.मौलाना आझाद, रिपन रोड, नागपाडा, सुरती मोहल्ल्यात मुस्लिम धर्मीय जास्त संख्येने राहत असत. लालबाग, एस ब्रिज, जेकब सर्कल या भागात हिंदू तर नागपाड्यात ज्यू आणि माझगांव, साखळी रोड या भागात पूर्वी ख्रिस्त लोक रहात असत.
 
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य
|स्थानक=भायखळा
|दक्षिणेकडचे स्थानक=सँडहर्स्ट रोड
ओळ १५:
|अंतर=५
}}
 
{{मुंबई}}
{{साचा:मुंंबई महानगर क्षेत्र}}
[[वर्ग:मुंंबई]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भायखळा" पासून हुडकले