"विज्ञानकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
विज्ञान कथा हा लिखित [[साहित्य|साहित्यातील]] एक प्रकार आहे. विज्ञानकथा लेखक [[आयझॅक आसिमॉव्ह]] यांनी हा कथा प्रकार चांगल्यापैकी हाताळला. मराठी अनुवादित विज्ञानकथा इ.स. १९०० पासून लिहिल्या जात आहेत. असे असले तरी खर्य़्हा अर्थानं इ.स. १९१६ साली स्वतंत्र मराठी विज्ञानकथा प्रकाशित झाली.
 
==केरळ कोकीळमध्ये पहिली विज्ञान कथा==
‘केरळ कोकीळ’च्या जून १९०० च्या अंकात ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून अॅन्ड बॅक’च्या क्रमश: अनुवादाला सुरुवात झाली. अनुवादकाला जमेल तसा हा अनुवाद १९०६ पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता. पण त्यावर अनुवाद करणार्‍याचे नाव नसे. म्हणजे त्याकाळच्या प्रथेप्रमाणे तो अनुवाद ‘केरळ कोकीळ’चे संपादक चित्रमयूर कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केला असावा असे गृहीत धरता येते.
 
==श्री.बा. रानडे यांची ‘तारेचे हास्य’ आणि ’रेडियम’==
श्री.बा. रानडे यांची ‘तारेचे हास्य’ ही विज्ञानकथा त्या वर्षी ‘मासिक मनोरंजन’च्या अंकात १९१६ साली मार्च महिन्यात प्रसिद्ध झाली. १९१६ सालीच श्री. बा. रानडे यांनी ‘उद्यान’ या मासिकात ‘रेडियम’ ही कथा लिहिली.
 
==क्ष किरण आणि स्त्रीचा डावा डोळा==
१९१६साली क्ष किरणाचा वापर सुरू झाला होता. स्त्रियांना डाव्या डोळाने कमी दिसते अशीही एक गैरसमजूत त्या काळी होती. या दोन्ही गोष्टींवर आधारित ‘अदृश्य किरणांचा दिव्य प्रताप’ आणि ‘वामलोचना’ नावाच्या ’विज्ञानकथा’ [[वामन मल्हार जोशी]]यांनी लिहिल्या आणि ‘नवपुष्प करंडक’ या संग्रहात प्रकाशित केल्या.
 
==पुढच्या काळात प्रसिद्ध झालेल्या मराठी विज्ञानकथा==
* त्र्यं.र. देवगिरीकरांची ’२०१८’ : ’चित्रमयजगता’त १९२३मध्ये प्रकाशित.
* त्र्यं.र. देवगिरीकरांची ’शरद लोकाची सफर’ : ’चित्रमयजगता’त १९३६मध्ये प्रकाशित.
* [[वि.वा. शिरवाडकर]]ांची कल्पनेच्या तीरावर
* [[ना.के. बेहेरे]] यांची ध्येयाकडे
 
==वैज्ञानिक असत्यांवर आधारलेल्या विज्ञानकथा==
एखादी गोष्ट विशिष्ट काळात वैज्ञानिक सत्य मानली जाते. पुढे अधिक संशोधनानंतर ती सत्य मानली गेलेली विज्ञानकल्पना ही ‘कल्पना’च होती, किंवा ती चुकीची होती, हे सिद्ध होते.. पण जेवढा काळ ती कल्पना सत्य मानली जात होती तोपर्यंत त्या कल्पनेवर आधारित साहित्य हे विज्ञान साहित्यच असते.
 
याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे १८१८ साली लिहिलेली मेरी शेलीची ‘फ्रँकेन्स्टाइन ऑर द मॉडर्न प्रॉमेथिअस’ ही कादंबरी होय. या कादंबरीपासून इंग्रजी विज्ञान साहित्याची सुरुवात झाली असे मानले जाते.
 
त्या काळात स्थिर विद्युतनिर्मिती तसेच विद्युतघट निर्मितीचे अलेक्झांड्रो व्होल्टा यांचे प्रयोग गाजत होते. विजेच्या तारेचा स्पर्श होताच मेलेला बेडूक पाय हलवतो- ही बातमी तेव्हा गाजत होती. त्यामुळे विजेच्या साहाय्याने मृत जीवाला संजीवनी मिळाल्याप्रमाणे पुनरुज्जीवित करता येते हीच कल्पना मेरीने तिच्या कथेत वापरली. कादंबरी १८१८मध्ये[रकाशित झाली, पण तिच्यावर मेरीचे नाव नव्हते. ‘स्त्रिया साहित्यनिर्मिती करू शकत नाहीत. जरी त्यांनी ती केली, तरी ती काळाच्या कसोटीवर टिकू शकत नाही,’ मेरीचे नाव टाकले असतेते कादंबरी खपली नसती असे प्रकाशकाला वाटले.
 
१८३१ मध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती निघाली. पुढची अनेक वर्षे या कादंबरीच्या सटीक आणि विशेष भाष्यासह, मानसिक पृथक्करणासह अशा विविध प्रकारच्या आवृत्त्या बाजारात आल्या, आणि येत आहेत. मेरी शेलीने सत्य ’मानलेले विजेचे झटके देऊन मृत जीव सजीव करता येतो’, हे गृहीतक खोटे ठरले, तरीही तिच्या या कादंबरीला अजूनही विज्ञान साहित्याचाच दर्जा देण्यात येतो.
 
 
 
==काही प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक==