"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[बागणी]] गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण [[इस्लामपूर|इस्लामपुरात]] झाले. [[इ.स. १९४०|१९४०]] साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या [[पुणे|पुण्यातील]] [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] गेल्या. [[इ.स. १९४४|१९४४]] साली त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.
 
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. लोकसाहित्याचे अतिशय उत्तम प्रकारे संशोधन, संपादन आणि संकलन करून या विषयांवरसंस्कृतीचा फार मोठा ठेवा त्यांनी अधिकमहाराष्ट्राला कामकायमचा केलेउपलब्ध करून दिला आहे.
 
सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांची भाषा शैली सोपी आणि प्रत्यक्ष संवाद करणारी अशी होती.
 
महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला श्री [[चिं.ग. कर्वे]] अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.
 
==सरोजिनी बाबर यांचे स्नेहीमंडळ==
५७,२९९

संपादने