"तुषार आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
==संगीताचे शिक्षण==
तुषारने बारावीत असताना ‘संगीत’ या विषयात विशेष प्रावीण्य मिळविल्यानंतर सिडनी येथील ‘सिडनी कॉन्झरव्हेटरियन ऑफ म्युझिक’ येथे संगीताचे पुढचे शिक्षण घेतले. त्याने सिडनी विद्यापीठातून ‘बॅचलर ऑफ लिबरल स्टडीज’ तसेच ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स’ येथून ‘मास्टर ऑफ जर्नालिझम’ही केले आहे.
 
==झीरोची निर्मिती==
२०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात टोरांटो येथील एका संगीत कार्यशाळेसाठी ऑस्ट्रेलियामधून ‘ऑस्ट्रेलियन परफॉर्मिग राइट असोसिएशन’ने तुषारची निवड केली होती. या कार्यशाळेत तुषारने ‘झीरो’ या गाण्याची निर्मिती केली. आघाडीचा पॉप गायक क्रिस ब्राऊन याच्या आवाजात त्या गाण्याची ध्वनिमुद्रिका निघाली. भारतातही ‘व्हीएच वन’ या वाहिनीवर हे गाणे दाखविले जाते.
 
==तुषारने संगीत दिलेली अन्य गाणी ==
हॉलीवूडच्या एका चित्रपटासाठीही तुषारने ‘ख्रिसमस साँग’ लिहिले. ‘एमटीव्ही’वरील युवकांसाठी असलेल्या एका रिअ‍ॅलिटी शोसाठी (द चॅलेंज) सध्या (इ.स.२०१५) तो काम करतो आहे. ‘युके’ (आयटीव्ही) नेटवर्कवर सेलिब्रेटी शेफ अ‍ॅडम रिचमन यांचा सहभाग असलेल्या ‘बीबीक्यू चॅम्प’या कुकिंगविषयक रिअ‍ॅलिटी शोच्या काही भागांचे संगीतही त्याचे होते. ‘एनबीसी’वरील ‘बिगेस्ट लुझर यूएसए’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या १७ व्या पर्वासाठीही तुषारनेच संगीत दिले.