"श्रीपाद वल्लभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
'''श्रीपाद वल्लभ''' हे [[दत्तात्रेय|श्रीदत्तात्रेयांचे]] कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात. कुरवपूर (आंध्र प्रदेश) येथे त्यांच्या पादुका असून अनेक भक्त दर्शनासाठी तेथे जातात. [[श्रीगुरुचरित्र]] या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या काही लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा ''''वेद'''' मानला जातो.
 
इ.स. १३२० मध्ये दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्म घेतला. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले.
 
समाजातील विकृती नाहीशी व्हावी, परकीय आक्रमणाने गांजलेली, विस्कळीत आणि दुर्बल झालेल्या समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला, असे मानले जाते.
 
श्रीपाद वल्लभांच्या अवतारानंतरच भारतामध्ये दत्त संप्रदायाची जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे.
 
[[वर्ग:हिंदू संत]]