"होलोकॉस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''होलोकॉस्ट''' (ग्रीक: ὁλόκαυστος ''होलोकाउस्तोस'' ; शब्दाची फोड: hólos, "संपूर्ण " आणि kaustós, "भाजणे") हे नाव [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] [[नाझी जर्मनी|नाझी जर्मनीकडून]] करण्यात आलेल्या [[ज्यू लोक|ज्यू लोकांच्या]] हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. दुसर्‍या महायुद्धापूर्वी [[युरोप|युरोपात]] सुमारे ९० लाख ज्यू निवासी होते ज्यांपैकी दोन तृतीयांश (६० लाख) ज्यू ह्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडले. ह्यांमध्ये ३० लाख पुरुष, २० लाख स्त्रिया व १० लाख बालकांचा समावेश होता. जगाच्या इतिहासामध्ये आजतागायत [[ज्यूविरोध|ज्यूविरोधाची]] ही सर्वात भयानक घटना मानली जाते.
 
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी [[ॲडॉल्फअॅडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]]च्या नेतृत्वाखाली [[नाझी जर्मनी]]ने जर्मन समाजाचे ''शुद्धीकरण'' करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व लोकांचे नष्टीकरण करण्याची [[न्युर्नबर्ग कायदे|योजना]] आखली. ह्या अंतर्गत जवळजवळ सर्व जर्मन ज्यू लोकांना अटक करून छळछावण्यांमध्ये ({{lang-en|Concentration camps}}) डांबले गेले. ह्या छावण्यांमधील दारूण परिस्थिती, उपासमार, रोगराई व अतिश्रमामुळे अनेक ज्यू मरण पावले. [[डखाउची छळछावणी|डखाउ]], [[बुखनवाल्डची छळछावणी|बुखनवाल्ड]], [[आउश्वित्झ छळछावणी|आउश्वित्झ]] ह्या सर्वात प्रथम उभारलेल्या छळछावण्या होत्या. युद्ध सुरू झाल्यानंतर जसेजसे नाझी जर्मनीने [[पूर्व युरोप|पूर्व युरोपातील]] देश जिंकण्यास सुरुवात केली तसतसे ह्या देशांमधील ज्यू लोकांसाठी नवीन छळछावण्या उभ्या करण्यात आल्या.
 
१९४२ साली ज्यूंच्या सामूहिक कत्तलीसाठी संहारछावण्या<ref>संहारछावणी ({{lang-en|''Extermination camp''}}, ''एक्सटर्मिनेशन कँप'')</ref>उभारण्यात आल्या. ह्या छावण्यांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर संहार एवढाच होता. ह्या छावण्यांमध्ये कैद्यांना एका मोठ्या बंदिस्त खोलीत डांबून त्या खोलीत विषारी वायू सोडला जात असे.