"जागतिक लोकसंख्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 48 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q11188
11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून ज
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ७:
[[वर्ग:मानवशास्त्र]]
 
11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत.
[[id:Penduduk#Penduduk dunia]]
विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. हय़ा शतकात अनेक विशेष महत्त्वाच्या, अनेक देशांच्या इतिहासाला कलाटणी देणार्या घटना, घडामोडी घडल्या. दोन जागतिक महायुध्दे, वसाहातिक देशांनी मिळविलेले स्वातंत्र्य, चंद्रावर मानवाचे पाऊल, अणुस्फोटामुळे समाप्त झालेले दुसरे महायुध्द, व्हिएतनामने अमेरिकेपुढे पत्करलेली शरणागती, अनेक मौलिक शोध, संशोधन, रशियाचा उदयास्त. हय़ा काही प्रतिनिधीक घडामोडी, घटना होत. हय़ाशिवाय 20व्या शतकात झालेली विश्वलोकसंख्येतील प्रचंड वाढ ही विशेष क्रांतिकारी घटना होय. 1927 साली विश्वलोकसंख्या होती 2 अब्ज, अवघ्या 30 वर्षात ती झाली 1959 मध्ये 3 अब्ज आणि 39 वर्षात विश्वलोकसंख्या दुप्पट म्हणजे 6 अब्ज. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जाचे अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जात आहे. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली.
आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हय़ा पाच खंडामधील देशात सर्वात कमी लोकसंख्या आणि अगदी कमी वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे ऑस्ट्रेलियाची. जगाच्या एकूण लोकसंख्येत 60 टक्के आशियामध्ये आहे. कारण चीन व भारत हे पहिल्या दोन क्रमांकाचे देश हय़ा खंडामध्ये आशियात आहेत. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे पण लोकसंख्या मात्र भारताच्या लोकसंख्येच्या 25 टक्के आहे म्हणजे 30 कोटी. 21व्या शतकात आशिया हा सर्वात अधिक लोकसंख्येचा खंड असेल. आफ्रिका खंडाची लोकसंख्या तिप्पटीहून अधिक असेल. 2011 मध्ये आफ्रिकाची लोकसंख्या होती 1 अब्ज. ती लोकसंख्या 2100 मध्ये 3.6 अब्ज होईल. 2011 मध्ये इतर खंडाची मिळून लोकसंख्या होती 1.7 अब्ज. 2060 मध्ये ही लोकसंख्या 2 अब्ज असेल. युरोपची लोकसंख्या 2025 मध्ये 0.74 अब्ज असेल आणि त्यानंतर युरोपच्या लोकसंख्येत आणखी घट होईल. आफ्रिका खंडाच्या लोकसंख्येत वाढ दर वर्षी 2.3 टक्के होत आहे तर आशिया खंडाची वाढ होत आहे 1 टक्के. जगाची लोकसंख्या होती अशी – 1804 – 1 अब्ज, 1927 – 2 अब्ज, 1959 – 3 अब्ज, 1974 – 4 अब्ज, 1987 – 5 अब्ज, 1999 – 6 अब्ज, 2011 – 7 अब्ज. संयुक्त राष्ट्रसंघाने 1999 – 6 अब्ज एक मोठा मैलाचा दगड म्हणून मानला.
भारताची लोकसंख्या 1947 मध्ये अंदाजे 36 कोटी होती. 2011 च्या जनगणनेनुसार आता देशाची लोकसंख्या 1.21 अब्ज झाली आहे. म्हणजे 64 वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पटीहून अधिक झाली आहे. अंदाजे दोन जनगणनेच्या काळात म्हणजे 10 वर्षात प्रत्येक वर्षी लोकसंख्येत 1.50 ते 1.75 कोटी भर पडत आहे. आपल्या देशात उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा हय़ा आठ राज्यातील लोकसंख्या वाढ विशेष आहे. हय़ा आठ राज्यांची एकूण लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येत जवळजवळ 48 टक्के आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या प्रगतीच्या दृष्टीने 150 जिल्हे मागासलेले आहेत. हे सारे जिल्हे हय़ा आठ राज्यातील आहेत. महाराष्ट्र, गुजरात, दक्षिणेतील चार राज्ये – आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ, पश्चिम बंगाल आदी राज्यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रमात चांगली कामगिरी बजावली आहे. केरळ राज्याने साक्षरता प्रसार, शिक्षण प्रमाणात वाढ, पायाभूत क्षेत्रामध्ये लक्षणीय सुधारणा करून आरोग्य सेवांचा उत्तम प्रसार करून विकासाच्या दृष्टीने एक मॉडेल निर्माण केले आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या भरीव प्रगतीस वरील बाबीमुळे साहाय्य झाले आहे, उपकारक ठरल्या आहेत. काँग्रेसप्रणित आणि डावी लोकशाही आघाडी राज्यांनी हा कार्यक्रम नेटाने, निर्धाराने पुढे नेला आहे.
1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1961 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या होती 3.95 कोटी. 1961-1971 दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 27.45 टक्के वाढ झाली. नंतरच्या दशकात 1971-1981 वाढ झाली 24.54. 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीहून अधिक होती. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत राजधानी मुंबईचा वाटा फार मोठा आहे. 2001 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1.19 कोटी होती आणि 2011 मध्ये ती लोकसंख्या 1.50 कोटीहून अधिक आहे. मुंबईच्या लोकसंख्या वाढीत राज्यातील इतर जिल्हय़ामधून व देशाच्या इतर राज्यांमधून नोकरी, दैनंदिन रोजीरोटी, शैक्षणिक संधी आदी कारणांसाठी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरण झाले आहे. 1991-2001 मध्ये दक्षिणेतील चारही राज्यातून मुंबईत येणार्यांचे प्रमाण घटले आहे. प्रमाण वाढले आहे ते उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून येणार्यांचे. 1991-2001 दशकात मुंबईची नैसर्गिक वाढ होती 61 टक्के. स्थलांतरणामुळे 43.7 टक्के. “लोकसंख्या ही मुंबईची नेहमीच दंडदेवता ठरली आहे. पण मुंबई म्हणजे काही केवळ आकडे नव्हे. संख्याशास्त्राचा संच नव्हे पण मुंबई म्हणजे शहरातील लोक, जनसामान्य.” असे म्हटले जाते. जन्मप्रमाण, मृत्यूप्रमाण, स्थलांतरण वाढीनुसार लोकसंख्या, स्त्री-पुरुष संख्येतील चढउतार होत असतात. मुंबई ही भारताची व्यापारी राजधानी व औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठे केंद्र आहे. हे सर्वमान्य आहे.
बाहेरच्या राज्यातून पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद हय़ा चार शहरातही मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत आहे. आधुनिकीकरण, औद्योगिकरण, शहरीकरण हय़ा तीन प्रमुख कारणांमुळे स्थलांतरण होत आहे. त्यामुळे शहरामध्ये जसा वाढत्या लोकसंख्येची समस्या निर्माण झाली आहे. त्याबरोबरच शहरामध्ये झोपडपट्टय़ामध्येही प्रचंड वाढ होत आहे, कारण शहरांमध्ये नोकरी, रोजगारी मिळेल पण बर्यांपैकी निवारा, आसरा, घर मिळणे ही विशेष कठीण बाब ठरली आहे. त्यामुळे झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर हाती घेतला जात आहे.
विश्वलोकसंख्येत पहिले 10 मोठय़ा लोकसंख्येचे देश आहेत चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, रशिया आणि जपान. आणि देशातील राज्ये आहेत. टक्केवारीत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू (तिन्ही राज्यातील टक्केवारी प्रत्येकी 6 टक्के) गुजरात, ओरिसा, झारखंड व केरळ (चारही राज्ये प्रत्येकी 3 टक्के) छत्तीसगड, पंजाब, हरयाणा (प्रत्येकी लोकसंख्या 2 टक्के) उत्तराखंड व दिल्ली (प्रत्येकी 1 टक्के, इतर राज्यांची 2 टक्के). देशातील मोठय़ा लोकसंख्येच्या राज्यात लोकसंख्यावाढीत घट होणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ व्हायला हवी हाच यंदाच्या विश्वलोकसंख्या दिनाचा संदेश आहे.