"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎योगदान: मजकूर विस्तार ~~~~
→‎योगदान: उपविभाग जोडला : सूफी तत्त्वप्रणालीची दोन वैशिष्टय़े
ओळ २४:
 
उत्तर भारतातील अली-उल् हुजवेरी, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती, ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी, फरीदुद्दीन गंजशकर, निजामुद्दीन अवलिया, बाबा फरीद, अमीर खुसरो या अग्रगण्य संतांनी आणि दक्षिण भारतातील बुऱ्हामुद्दीन गरीबशाह, मुन्ताजिबुद्दीन जरदरीबक्ष, जैनुद्दीन, ख्वाजा बन्दानवाज गेसूदराज, ख्वाजा अमीनुद्दीन आला या संतांनी केलेल्या कार्याची माहिती डॉ. वकील देतात.
 
===सूफी तत्त्वप्रणालीची दोन वैशिष्टय़े===
‘वहदतुल वजूद’ व ‘वहदतुल शुहूद’ या सूफींच्या तत्त्वप्रणालीची दोन महत्त्वपूर्ण वैशिष्टय़े डॉ. अलीम यांनी स्पष्ट केली आहेत. ही दोन्ही वैशिष्टय़े एका ईश्वरावर निष्ठा (तौहिद) आणि त्या अस्तित्वाची जाणीव यावर आधारित आहेत. वहदतुल वजूद म्हणजे ईश्वर एक असून त्याचे चराचर व्यापले आहे . त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येक सूफीला असली पाहिजे. डॉ. वकील दाखवून देतात की हे दोन्ही सिद्धान्त इब्नुल अरबी यांनी सर्वप्रथम मांडले. ईश्वराशी तादात्म्य पावण्यासाठी सूफी साधकाला अनेक आध्यात्मिक टप्पे (मकामात) पार पाडावे लागतात. हे टप्पे सूफी संतांच्या मते वेगळे असू शकतात. या टप्प्यांत ‘कुरआन’मधील ‘सुलूक’ (सद्वर्तन) व ‘हदीस’मधील एहसान (परोपकार) यावर भर देण्यात आला आहे. या वैशिष्टय़ांची तुलना डॉ. अलीम यांनी ‘तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीशी केली आहे.<ref>दोन संप्रदायांच्या माहितीचा कोश : डॉ. दाऊद दळवी, http://www.loksatta.com/lokrang-news/rasagrahan-gazetteer-of-two-traditions-17886/</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले