"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
छो मजकूर विस्तार ~~~~
ओळ २०:
 
डॉ. अलीम यांनी भक्ती चळवळ आणि सूफी संप्रदायातील गूढवादी व गहन तत्त्वज्ञानाचे विश्लेषण प्रभावी शब्दात केले आहे. [[हिंदू]] संस्कृतीतील [[कर्ममार्ग]], ज्[[ञानमार्ग]] व [[भक्तीमार्ग]] यांचा ऊहापोह केला आहे. सातव्या आणि आठव्या शतकात [[बौद्ध धर्म]] व [[जैन धर्म]] यांना उतरती कळा लागली आणि हिंदू धर्मात ज्ञानमार्ग व कर्ममार्ग हे मुक्तीसाठी पुरेसे नसल्यामुळे त्या काळातील विचारवंतांना ही पोकळी भरून काढण्यासाठी नवी दिशा हवी होती, ती सूफी चळवळ आणि भक्ती चळवळ या दोन मार्गांच्या माध्यमातून मिळाली, अशी मांडणी ते त्यांच्या ‘एका पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी’ या ग्रंथात करतात. हा ग्रंथ मराठी आध्यात्मिक साहित्यात मोलाची भर घालणारा आहे.<ref>दोन संप्रदायांच्या माहितीचा कोश : डॉ. दाऊद दळवी, http://www.loksatta.com/lokrang-news/rasagrahan-gazetteer-of-two-traditions-17886/</ref>
 
या ग्रंथात डॉ. अलीम यांनी सूफी संप्रदायाचे विवेचन करताना विविध सूफी पंथ व आदर्शभूत तसेच श्रेष्ठ सूफी संतांची माहिती दिली आहे. ‘विविध सूफी संप्रदाय’ व ‘काही सूफी संत’ या दोन प्रकरणांतून सूफी संप्रदायाचा उगम, त्याची उद्दिष्टे, संघटना व श्रेष्ठ संतांचे योगदान यांची अतिशय तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. अशी माहिती यापूर्वी देणाऱ्या स्पेनचे प्रकांडपंडित शेख मुहियुद्दीन इब्नुल अरबी (सन १२४१) व शेख अब्दुल करीम इब्न, इब्राहिम-ई-जिली यांच्या कार्याची सविस्तर चर्चा डॉ. वकील यांनी केली आहे. संतशिरोमणी जुन्नून अल् मिसरी, बायनीद बुस्तामी, अबुसईद इब्न अबि’ल खैर, हसन मन्सूर अल् हज्जाज, इमाम गज़ाली, रूमी, उमर खय्याम, शेख सादी, हाफीज, जामी हे पुरुष संत तसेच राबिया बसरी, बीबी हाफ़िजा व बीबी फातिमा खुद्रिया यांच्यासारख्या महिला सूफी संत, यांचीही माहिती ते देतात.
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले