"हंबीरराव मोहिते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ११:
 
महाराजांच्या द्वितीय पत्‍नी [[सोयराबाई]] या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका [[ताराबाई|महाराणी ताराबाई]] ह्या [[छत्रपती राजाराम|राजाराम]] महाराजांच्या पत्‍नी होत्या.
 
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
 
शिवाजीने राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बर्‍हाणपूर, वर्‍हाड, माहूड, वरकड प्रर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला. यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. '''सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल''' या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. ही तलवार प्र्तापगडावरील भावानी मातेच्या मंदिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत.
 
हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते हे शिवाजीला गोवळकोंड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हंबीरराव मात्र नंतर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले. दरम्यान युवराज छत्रपती संभाजी राजेंचे मोगलांना जाऊन मिळणे, पुन्हा परत येणे वगैरे घटना घडल्या.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीचे निधन झाले. यावेळी हंबीरराव कर्‍हाड परिसरात छावणी टाकून होते.
 
शिवाजीच्या मृत्यूनंतर संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच संभाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते. हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.
 
संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्‍हाणपूरचा विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानंतर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्‍न केला. त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बहाद्दुररखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतु हंबीररावांना तोफ़ेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले.