"सूरदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दुवा
No edit summary
ओळ १:
'''सूरदास''' (सुमारे [[इ.स. १४७८]] - सुमारे [[इ.स. १५६३]]) हे [[हिंदी]]च्या [[ब्रज]] बोलीभाषेत लिहीणारे एक भक्तकवी होते. हे त्यांच्या [[सूरसागर]] या ग्रंथासाठी ते प्रसिद्ध आहेत.
 
सूरदासांचा जन्म [[दिल्ली]]जवळच्या सीही गावात एका सारस्वत ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे आयुष्य [[आग्रा|आग्र्याजवळच्या]] गऊघाट व [[मथुरा|मथुरेजवळच्या]] गोवर्धन या गावांत गेले. [[वल्लभाचार्य|वल्लभाचार्यांनी]] त्यांना [[श्रीकृष्ण]]भक्तीचा उपदेश दिला. सूरसागर या ग्रंथात श्रीकृष्णाच्या जीवनाचे वर्णन आहे. त्यातील काव्य व गानसौंदर्यामुळे ते तत्कालीन समाजात प्रसिद्ध झाले. सूरदासांची प्रसिद्धी ऐकून [[तानसेन|तानसेनाच्या]] मध्यस्थीने [[अकबर]] बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या सांगण्यावरून सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे. या प्रसंगानंतरही अकबराने सूरसागराचा [[फारसी]] अनुवाद करवला. सूरसागरातील भ्रमरगीत हा भाग साहित्यिक दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथाने हिंदी भाषेचे सौंदर्य वाढवले असे म्हटले जाते. आधुनिक काळात सूरसागराचे प्रकाशन [[वाराणसी]]च्या [[नागरी प्रचारिणी सभेने]] १९५० मध्ये केले. २०१५ मध्ये सूरसागराचे इंग्लिश भाषांतर [[हार्वर्ड विद्यापीठ|हार्वर्ड विद्यापीठाने]] प्रकाशित केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/सूरदास" पासून हुडकले