"श्याम मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखन, बांधणी
छो मजकूर दुरुस्ती ~~~~
ओळ ३१:
}}
 
'''श्याम मनोहर''' उर्फ '''श्याम मनोहर आफळे''' ([[२७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४१]]:भिकार, [[तासगाव]], [[सांगली जिल्हा]], महाराष्ट्र - )<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref> हे [[मराठी]] भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या ''उत्सुकतेने मी झोपलो'' या [[कादंबरी]]साठी [[इ.स. २००८]]चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला. ''काँपिटिशन'' ही त्यांची पहिली कथा ualr.<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref>
 
श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे [[सातारा]] जिल्ह्यातील [[क्षेत्रमाहुली]]चे रहिवासी असून ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घर आहे.
 
श्याम मनोहर हे [[पुणे|पुण्यातील]] [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय |सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून २००१ साली निवृत्त झाले.
 
मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते.त्यांनी ‘कादंबरी’ या वाड्‌मय प्रकाराची परिभाषाच बदलली, असे म्हंटले जाते. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परकिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्घतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या कादंबरीलेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणार्‍या भाषेतून प्रकट करतात.<ref>https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar</ref>